GRAMIN SANWAD, Author at ग्रामीण संवाद

महाराष्ट्र बंदला वलांडीत कडकडीत प्रतिसाद; विविध मागण्यांसाठी वंचित बहुजन आघाडीचे निवेदन
वलांडी | प्रतिनिधी

वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी लडाखचे सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक आणि अभिजीत दिपके यांच्या उपोषणाला पाठिंबा दर्शवत दिलेल्या महाराष्ट्र बंदच्या हाकेला प्रतिसाद देत देवणी तालुक्यातील वलांडी येथे गूरूवारी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अत्यावश्यक सेवा वगळता मुख्य बाजारपेठ सायंकाळी ५ वाजेपर्यंत पूर्णपणे बंद ठेवण्यात आली.

बंदच्या पार्श्वभूमीवर निषेध रॅलीची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. त्यानंतर आंबेडकर चौकातून शांततेत रॅली काढण्यात आली. रॅली मुख्य चौकात आल्यानंतर पोलीस प्रशासनाच्या उपस्थितीत महसूल विभागाचे तलाठी सागावे यांच्यामार्फत देवणी तहसीलदारांना निवेदन सादर करण्यात आले. हे निवेदन तहसीलदारांमार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठविण्यात आले.

निवेदनात नीट पेपरफुटी प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, अशी प्रमुख मागणी करण्यात आली. तसेच दिल्लीतील जंतर-मंतर येथे आंदोलनादरम्यान झालेल्या कथित लाठीचार्जची निष्पक्ष व सखोल चौकशी करून जखमी विद्यार्थ्यांना तसेच मृत्यू पावलेल्या विद्यार्थिनीच्या कुटुंबीयांना शासनाकडून योग्य आर्थिक मदत, वैद्यकीय सहाय्य व पुनर्वसन देण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली.

याशिवाय पंजाबमधील शेतकरी आंदोलनादरम्यान अन्यायग्रस्त शेतकरी व त्यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळावा, दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी तसेच पात्र लाभार्थ्यांना योग्य नुकसानभरपाई देण्यात यावी, अशीही मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (महा टीईटी) पेपरफुटी प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित दोषींवर फौजदारी कारवाई करावी, दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांना तात्काळ निलंबित करावे, तसेच भविष्यात नीट, टीईटी व इतर स्पर्धा परीक्षांमध्ये प्रश्नपत्रिका गळतीसारखे प्रकार होऊ नयेत यासाठी अत्याधुनिक सुरक्षा व्यवस्था, डिजिटल सुरक्षायंत्रणा, पारदर्शक परीक्षा प्रणाली आणि कठोर कायदेशीर यंत्रणा लागू करावी, अशी मागणीही करण्यात आली.

आंदोलनादरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी देवणी पोलीस ठाण्याचे सपोनि खोडेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अक्षय पाटील, मोहन केंद्रे व पवन गायकवाड यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.

यावेळी वंचित बहुजन आघाडीचे अविनाश गायकवाड, अहमद सौदागर, मुकेश कांबळे, धनराज बनसोडे, काँग्रेसचे कार्यकर्ते विलास वाघमारे, रहीम शेख यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले.

GRAMIN SANWAD

graminsanwad.co.in/

The post महाराष्ट्र बंदला वलांडीत कडकडीत प्रतिसाद; विविध मागण्यांसाठी वंचित बहुजन आघाडीचे निवेदन appeared first on ग्रामीण संवाद.

देवणी तालुक्यातील महादेववाडीत हिंस्र प्राण्याचा धुमाकूळ; तीन शेळ्या व तीन पिल्ले ठार, दोन जनावरे जखमी
वलांडी | प्रतिनिधी

देवणी तालुक्यातील महादेववाडी येथे शुक्रवारी दुपारी सुमारे १२ वाजण्याच्या सुमारास हिंस्र प्राण्याने केलेल्या हल्ल्यात तीन शेळ्या व त्यांची तीन पिल्ले जागीच ठार झाली. तसेच एका वासरावर हल्ला करून त्याचे पोट फाडल्याने ते गंभीर जखमी झाले.

महादेववाडी येथील शेतकरी अंकुश हणमंत गूजे यांच्या शेतात बांधलेल्या शेळ्यांवर या हिंस्र प्राण्याने हल्ला केला. या हल्ल्यात तीन शेळ्या आणि तीन पिल्लांचा मृत्यू झाला, तर एका वासराला गंभीर दुखापत झाली.

याच परिसरातील बोंबळी शिवारात शेतकरी शामराव शिंदे यांच्या शेतात बांधलेल्या पारडूवरही हिंस्र प्राण्याने हल्ला केला. या हल्ल्यात पारड्याचे कान, पोट आणि पायावर गंभीर जखमा झाल्या आहेत.

या सलग हल्ल्यांमुळे महादेववाडी व बोंबळी परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, जनावरांच्या सुरक्षेबाबत गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे.

घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून नुकसानीची नोंद घेतली. तसेच संबंधित हिंस्र प्राण्याचा मागोवा घेण्यासाठी शेतकऱ्यांच्या शेतात दोन सीसीटीव्ही (ट्रॅप) कॅमेरे बसविण्यात आले आहेत. शासनाच्या नियमानुसार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना योग्य ती नुकसानभरपाई दिली जाईल, असे वनविभागाने सांगितले.

दरम्यान, संबंधित हिंस्र प्राण्याचा शोध लागेपर्यंत महादेववाडी व बोंबळी शिवारातील शेतकऱ्यांनी जनावरे सुरक्षित ठिकाणी बांधावीत, रात्रीच्या वेळी विशेष खबरदारी घ्यावी आणि कोणताही संशयास्पद प्रकार अथवा हिंस्र प्राणी आढळल्यास तात्काळ वनविभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन वनविभागाकडून करण्यात आले आहे.

GRAMIN SANWAD

graminsanwad.co.in/

The post देवणी तालुक्यातील महादेववाडीत हिंस्र प्राण्याचा धुमाकूळ; तीन शेळ्या व तीन पिल्ले ठार, दोन जनावरे जखमी appeared first on ग्रामीण संवाद.

मोहरम उत्सवात वलांडीत उसळला जनसागर; सर्वधर्मीयांचा सहभाग
वलांडी | प्रतिनिधी

देवणी तालुक्यातील वलांडी येथे मोहरम सण यंदाही मोठ्या श्रद्धा, उत्साह आणि धार्मिक वातावरणात साजरा करण्यात आला. मुस्लिम दिनदर्शिकेनुसार दहाव्या मोहरमनिमित्त शुक्रवारी (दि. २६ जून) पारंपरिक सवाऱ्यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत सर्वधर्मीय नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन घडवले.

यावेळी मौलाली, इमामे कासीम, बडे नालसाब, छोटे नालसाब आणि हुसेन बाशा या पारंपरिक सवाऱ्यांची गावातून वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आली. शतकानुशतके जपल्या गेलेल्या परंपरेनुसार सहाव्या मोहरमला रात्री २ वाजता आणि नवव्या दिवशी दुपारी २ वाजता मौलाली सवारी उठविण्यात आली.

इमामे कासीम ही पारंपरिक व प्रतिष्ठित सवारी तब्बल नऊ वर्षांनंतर सातव्या दिवशी रात्री ३ वाजता उठविण्यात आली. ‘भंगे अलावा’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या या सवारीला ऐतिहासिक महत्त्व असून ती भाविकांसाठी विशेष आकर्षण ठरली. तसेच आठव्या व दहाव्या दिवशी बडे नालसाब आणि छोटे नालसाब यांच्या सवाऱ्यांची मिरवणूक काढण्यात आली. हुसेन बाशा यांची सवारी नवव्या दिवशी पहाटे ५ वाजता आणि दहाव्या दिवशी सायंकाळी ५ वाजता मोठ्या उत्साहात निघाली. सुमारे ३० ते ४० मानकरी रिंगण करून ही सवारी गावभर फिरविण्यात आली. येशीजवळ श्रीफळ अर्पण करून विविध सवाऱ्यांना भेट देत धार्मिक विधी पार पाडण्यात आले.

दहाव्या मोहरम दिवशी बडे नालसाब सवारीबाबत भाविकांमध्ये विशेष श्रद्धा दिसून आली. सवारीच्या मार्गात महिला, पुरुष तसेच लहान बालकांना सवारीचा स्पर्श (तुडवणे) झाल्यास मनोकामना पूर्ण होतात, अशी भाविकांची श्रद्धा आहे. त्यामुळे दरवर्षी या सवारीसाठी हजारो भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहून दर्शन व आशीर्वाद घेतात.

मोहरम निमित्त गावात भाविकांची मोठी गर्दी

मोहरम उत्सवानिमित्त वलांडीत भाविकांची मोठी गर्दी झाली होती. मुंबई, पुणे, हैदराबाद, चेन्नई, लातूर, उदगीर तसेच परिसरातील अनेक गावांमधून ग्रामस्थ आणि भाविक मोठ्या संख्येने दाखल झाले. हजारो भाविकांच्या उपस्थितीमुळे संपूर्ण गाव श्रद्धा, भक्ती आणि बंधुभावाच्या वातावरणाने भारावून गेले होते. भाविकांच्या सेवेसाठी विविध ठिकाणी दुधाचे सरबत वाटप करण्यात आले.

उत्सवादरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी देवणी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आण्णाराव खोडेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पोलीस प्रशासन, ग्रामस्थ आणि मोहरम उत्सव समिती यांच्या समन्वयामुळे संपूर्ण मोहरम उत्सव शांततापूर्ण, शिस्तबद्ध आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

GRAMIN SANWAD

graminsanwad.co.in/

The post मोहरम उत्सवात वलांडीत उसळला जनसागर; सर्वधर्मीयांचा सहभाग appeared first on ग्रामीण संवाद.

मोहरम सणानिमित्त वलांडी येथे शांतता समितीची बैठक संपन्न
मोहरम सणानिमित्त वलांडी येथे शांतता समितीची बैठक संपन्न

वलांडी | प्रतिनिधी

देवणी तालुक्यातील वलांडी येथे आगामी मोहरम सणाच्या पार्श्वभूमीवर शांतता, सुव्यवस्था व कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी वलांडी पोलीस दूरक्षेत्रात शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली. ही बैठक देवणी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक (सपोनि) अनिल खोडेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

बैठकीत मोहरम सणादरम्यान निघणाऱ्या पंजा व सवारी मिरवणुका निर्धारित वेळेत, शिस्तबद्ध व शांततेच्या वातावरणात पार पाडाव्यात, असे आवाहन सपोनि अनिल खोडेवाड यांनी केले. कोणत्याही प्रकारचे गैरप्रकार, वाद-विवाद किंवा कायदा-सुव्यवस्थेला बाधा पोहोचेल असे कृत्य टाळून सर्वांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असेही त्यांनी सांगितले.

मोहरम सणाच्या कालावधीत गावात अवैध देशी दारू विक्री व सेवनावर विशेष लक्ष ठेवण्यात येणार असून, शांतता व सामाजिक सलोखा कायम राखण्यासाठी आवश्यक ती प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येईल, अशी माहितीही त्यांनी दिली.

यावेळी गावातील माजी सरपंच राम भंडारे, बाजार समितीचे अध्यक्ष उमाकांत नागलगावे, अरुण पाटील, जनार्धन पिंजरे, धनराज बिरादार,  पत्रकार विविध सवारी प्रमुख तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

GRAMIN SANWAD

graminsanwad.co.in/

The post मोहरम सणानिमित्त वलांडी येथे शांतता समितीची बैठक संपन्न appeared first on ग्रामीण संवाद.

वलांडीत ‘थंड पाण्याच्या’ नावाखाली नागरिकांच्या आरोग्याशी खेळ? आरओ व जार प्लांटच्या चौकशीची मागणी;तुकाराम मुंडे यांचे लक्ष वेधणार का?
वलांडी | प्रतिनिधी

भर उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली असून, थंड पाण्याच्या जारचा वापरही नागरिकांकडून मोठ्या प्रमाणावर केला जात आहे. मात्र या वाढत्या मागणीचा फायदा घेत तालुक्यातील काही आरओ पाणी जार प्रकल्पांमध्ये नियमांचे पालन होत आहे का, याबाबत नागरिकांमधून गंभीर शंका व्यक्त करण्यात येत असून संबंधित यंत्रणेकडून सखोल चौकशीची मागणी होत आहे.

नियमांनुसार पिण्याच्या पाण्याच्या व्यवसायासाठी अन्न व औषध प्रशासन (FDA) कडे आवश्यक नोंदणी, नियमित पाणी नमुना तपासणी, प्रयोगशाळा चाचण्या तसेच गुणवत्ता अहवालाची नोंद ठेवणे बंधनकारक असते. मात्र तालुक्यातील काही ठिकाणी या नियमांचे काटेकोर पालन होत नसल्याची चर्चा नागरिकांतून सुरू आहे. काही ठिकाणी केवळ पाणी थंड करून अथवा अपुरी प्रक्रिया करून जारमध्ये भरून विक्री केली जात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

या पाण्याची गुणवत्ता नेमकी काय आहे? त्यामध्ये जीवाणू अथवा इतर घातक घटक आहेत का? संबंधित प्रकल्पांकडे आवश्यक परवाने व नोंदणी आहेत का? असे अनेक प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केले जात आहेत. पिण्याच्या पाण्याशी थेट नागरिकांच्या आरोग्याचा संबंध असल्याने या विषयाकडे गांभीर्याने पाहण्याची गरज व्यक्त होत आहे.

राज्यात अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर तुकाराम मुंडे यांनी भेसळयुक्त पनीर, दूध, खवा तसेच विविध खाद्यपदार्थांवरील गैरप्रकारांविरोधात धडक कारवाया करून भेसळ माफियांवर मोठी कारवाई केली आहे. त्यामुळे वलांडी व परिसरातील आरओ व पाणी जार व्यवसायाचीही तपासणी करून वस्तुस्थिती जनतेसमोर आणावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

तालुक्यात एकूण किती आरओ व जार प्लांट कार्यरत आहेत, त्यापैकी किती प्रकल्पांकडे वैध परवाने आहेत, किती जणांनी FDA कडे नोंदणी केली आहे, किती प्रकल्पांची नियमित पाणी तपासणी होते आणि किती ठिकाणी नियमांचे उल्लंघन होत आहे, याची माहिती सार्वजनिक करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

तसेच अन्न व औषध प्रशासनाच्या स्थानिक अधिकाऱ्यांनी आतापर्यंत किती तपासण्या केल्या, किती पाणी नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले आणि त्यामध्ये किती प्रकरणांमध्ये कारवाई करण्यात आली, याबाबतही पारदर्शकता ठेवण्याची आवश्यकता व्यक्त केली जात आहे.

नागरिकांच्या आरोग्याशी थेट संबंधित असलेल्या या विषयाची तातडीने दखल घेऊन तालुक्यातील सर्व आरओ व पाणी जार प्रकल्पांची विशेष तपासणी मोहीम राबवावी, पाण्याच्या गुणवत्तेची पडताळणी करावी आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरत आहे.

‘स्वच्छ आणि सुरक्षित पिण्याचे पाणी हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत अधिकार आहे. त्यामुळे या प्रश्नाकडे संबंधित विभागाने केवळ तक्रार म्हणून नव्हे, तर सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने गांभीर्याने पाहण्याची गरज आहे,’ अशी भावना नागरिक व्यक्त करत आहेत.

आता अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांचे लक्ष देवणी तालुक्यातील या गंभीर प्रश्नाकडे वळणार का आणि संबंधित यंत्रणेला धडक कारवाईस भाग पाडणार का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

GRAMIN SANWAD

graminsanwad.co.in/

The post वलांडीत ‘थंड पाण्याच्या’ नावाखाली नागरिकांच्या आरोग्याशी खेळ? आरओ व जार प्लांटच्या चौकशीची मागणी;तुकाराम मुंडे यांचे लक्ष वेधणार का? appeared first on ग्रामीण संवाद.

देवणी येथे डिव्हायडरला कारची जोरदार धडक; चालक विवेक टिळे किरकोळ जखमी
प्रतिनिधी | वलांडी

देवणी येथे ३० मार्च रोजी सायंकाळी सुमारे ९.३० वाजता वेगाने जात असलेली एमएच १२ पीटी ७०८९ क्रमांकाची मारुती सुजुकी विटारा ब्रेझा कार अचानक नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या डिव्हायडरवर जाऊन आदळली. धडक एवढी जोरदार होती की कारचे पुढील छत आणि विंडस्क्रीन पूर्णतः चकनाचूर झाले. या अपघातात चालक विवेक टिळे (रा. दवणहिप्परगा) हे किरकोळ जखमी झाले आहेत.

अपघाताच्या धडकेनंतर कार पलटी झाली होती. मात्र स्थानिक नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत वाहन सरळ केले. एअरबॅग वेळेवर उघडल्याने विवेक टिळे यांचा जीव थोडक्यात बचावला. अपघाताच्या वेळी ते एकटेच प्रवास करत असल्याने मोठी जीवितहानी टळली.

जखमी चालकाला नागरिकांच्या मदतीने तातडीने ग्रामीण रुग्णालय, देवणी येथे हलवण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.

घटनास्थळी देवणी पोलिसांनी त्वरित भेट देत वाहतूक सुरळीत केली. प्राथमिक माहितीप्रमाणे वाहनाचा ताबा सुटल्याने हा अपघात घडल्याचा अंदाज आहे.

ड्रीम कन्स्ट्रक्शनचा भोंगळ कारभार – नागरिकांचा संताप वाढला——–

या अपघातानंतर पुन्हा एकदा ड्रीम कन्स्ट्रक्शनच्या ढिसाळ आणि भोंगळ कामकाजावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. अर्धवट रस्ते, असमान डांबरीकरण, चेतावणी फलकांचा अभाव आणि नीट न केलेल्या डिव्हायडरमुळे वारंवार अपघात घडत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

“ड्रीम कन्स्ट्रक्शनचा निष्काळजी कारभार आणखी किती जीव धोक्यात घालणार? प्रशासनाला अजून किती अपघातांची वाट पाहायची आहे?”

रस्त्यांच्या दुरवस्थितीकडे प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप होत असून संबंधित ठेकेदारावर कारवाईची जोरदार मागणी स्थानिकांकडून होत आहे.

GRAMIN SANWAD

graminsanwad.co.in/

The post देवणी येथे डिव्हायडरला कारची जोरदार धडक; चालक विवेक टिळे किरकोळ जखमी appeared first on ग्रामीण संवाद.

अरविंद पाटील निलंगेकर यांच्या वाढदिवसानिमित्त जवळगा येथे मोफत मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर
प्रतिनिधी/ वलांडी

तालुक्यातील जवळगा येथे दि ६ मार्च रोजी अरविंद पाटील निलंगेकर यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून जवळगा येथे मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले. हे शिबिर उदगीर लायन्स क्लब, उदगीर यांच्या वतीने आयोजित करण्यात आले होते. या उपक्रमामुळे परिसरातील अनेक नागरिकांना नेत्र तपासणी व मोफत उपचाराची सुविधा उपलब्ध झाली.

दि. ६ मार्च रोजी आयोजित करण्यात आलेल्या या तपासणी शिबिरात एकूण ७५ नागरिकांची नेत्र तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान मोतीबिंदू आढळलेल्या २० रुग्णांची निवड शस्त्रक्रियेसाठी करण्यात आली. या सर्व रुग्णांवर दि. ७ मार्च रोजी उदयगिरी लॉयन्स नेत्र रुग्णालय, उदगीर येथे मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आली.

या शिबिरामुळे ग्रामीण भागातील गरजू नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून अनेकांनी या उपक्रमाचे स्वागत केले.यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य प्रशांत पाटील, माजी सरपंच तथा प्राचार्य डॉ. रामलिंग मुळे, इस्मालवाडीचे सरपंच पांडुरंग बिरादार, माजी सरपंच हणमंत बिरादार, सुरज मुळे, रंगलाल धूत, नरसिंग बोडके, गोविंद वळसंगे, दयानंद पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी आयोजकांनी सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार मानले.

GRAMIN SANWAD

graminsanwad.co.in/

The post अरविंद पाटील निलंगेकर यांच्या वाढदिवसानिमित्त जवळगा येथे मोफत मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर appeared first on ग्रामीण संवाद.

अल्पवयीन मुलीस फूस लावून पळविण्याचा प्रकार; देवणी पोलिसांनी दोन तासांत लावला शोध
प्रतिनिधी / वलांडी

देवणी तालुक्यातील पोलीस ठाणे हद्दीत एका अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेल्याच्या घटनेत देवणी पोलिसांनी तातडीने कारवाई करत अवघ्या दोन तासांत पीडित मुलीचा शोध लावून तिला ताब्यात घेतले. या प्रकरणी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, दि. ५ मार्च २०२६ रोजी फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून देवणी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ५१/२०२६ अन्वये भा.दं.सं. कलम १३७ (२) व बीएनएसएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेल्याची गंभीर घटना लक्षात घेऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार तातडीने तपास पथक नेमण्यात आले.

तपास पथकाने तांत्रिक माहिती व गुप्त बातमीदारांच्या मदतीने शोधमोहीम सुरू केली. मिळालेल्या माहितीनुसार पीडित मुलगी सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ मंदिर परिसरात असल्याचे समजले. त्यानंतर देवणी पोलिसांनी अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्याशी संपर्क साधून आवश्यक माहिती दिली. अक्कलकोट उत्तर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत संबंधित मुलीस ताब्यात घेतले.

यानंतर देवणी पोलिसांचे तपास अधिकारी आर. जी. लामतुरे यांनी अक्कलकोट येथे जाऊन पीडित मुलीस ताब्यात घेत देवणी येथे आणले. पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू असून प्रकरणाचा तपास सुरू आहे.

ही कारवाई लातूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण व उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल ढूमे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. देवणी पोलीस ठाण्याचे सपोनि बी. एस. गायकवाड, पोलीस हवालदार आर. जी. लामतुरे, गोपे व त्यांच्या पथकाने ही कारवाई यशस्वीपणे पार पाडली.

GRAMIN SANWAD

graminsanwad.co.in/

The post अल्पवयीन मुलीस फूस लावून पळविण्याचा प्रकार; देवणी पोलिसांनी दोन तासांत लावला शोध appeared first on ग्रामीण संवाद.

देवणी परिसरातील नागराळ जंगलात चोरीचा तांब्याचा तारसाठा जप्त; एकास अटक
प्रतिनिधी वलांडी|  मूकेश कांबळे

देवणी तालुक्यातील नागराळ जंगल परिसरात चोरीच्या तांब्याच्या तारा बाळगणाऱ्या एका तरुणास पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी देवणी पोलीस ठाणे येथे दि. २२ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र पोलीस कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दि. २२ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी १.३० वाजण्याच्या सुमारास देवणीपासून सुमारे ८ कि.मी. अंतरावर असलेल्या नागराळ जंगल परिसरात संशयास्पद हालचाली आढळून आल्या. याप्रकरणी वनरक्षक सुर्यकांत रमेशराव घोगरे देवणी यांच्या फिर्यादीवरून आरोपी चंद्रकांत वामन शेल्हाळे (वय २४, रा. शेकापूर, ता. उदगीर) यास ताब्यात घेण्यात आले.

तपासादरम्यान आरोपीकडून अंदाजे ६ किलो वजनाची तांब्याची तार (किंमत सुमारे ६ हजार रुपये) तसेच टीव्हीएस रायडर कंपनीची मोटारसायकल क्र. एम एच २४-बी एम -९७०८ किंमत सुमारे ६० हजार रुपये असा चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर माल हा विक्रीच्या उद्देशाने बेकायदेशीररीत्या ताब्यात बाळगल्याचे निष्पन्न झाले आहे.

या प्रकरणी सपोनि भिमराव गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली गुरनं ४२/२०२६ अन्वये महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १२४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या प्राथमिक तपासात आरोपीने मजुराचा वेष धारण करून गुप्तरीत्या चोरी केल्याचे समोर आले.

या गुन्ह्याचा पुढील तपास हेडकॉन्स्टेबल गायकवाड करीत असून, जंगल परिसरातील इतर चोरीच्या घटनांशी या गुन्ह्याचा संबंध आहे का, याचा सखोल शोध घेतला जात आहे.

GRAMIN SANWAD

graminsanwad.co.in/

The post देवणी परिसरातील नागराळ जंगलात चोरीचा तांब्याचा तारसाठा जप्त; एकास अटक appeared first on ग्रामीण संवाद.

मुख्य रस्त्यावरील सांडपाण्याचा प्रश्न ऐरणीवर; वलांडीत एमआयएम आक्रमक
प्रतिनिधी/ वलांडी

तालुक्यातील वलांडी गावातील मुख्य रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले असले, तरी रस्त्याच्या कडेला नाली बांधकाम न झाल्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. पावसाळ्यात साचलेले पाणी थेट घरांमध्ये व दुकानांमध्ये शिरत असल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. याबाबत वारंवार तक्रारी व निवेदने देऊनही ग्रामपंचायत प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

एमआयएमच्या वतीने दि. १८ फेब्रुवारी रोजी ग्रामविकास अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, गावातील मुख्य रस्त्यावर नाली नसल्यामुळे संपूर्ण सांडपाणी रस्त्यावरून वाहत असून त्यामुळे गावभर दुर्गंधी पसरली आहे. विशेषतः प्रभाग क्रमांक ४ मधील सर्व गल्ल्यांतील सांडपाणी मुख्य रस्त्यावर जमा होत असल्याने त्या गल्ल्यांमध्ये ये-जा करताना नागरिकांना साचलेल्या घाण पाण्यातूनच वाट काढावी लागत आहे.

साचलेल्या पाण्यामुळे डासांची उत्पत्ती होत असून डेंग्यू, मलेरिया यांसारख्या आजारांचा धोका निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे याच भागात मुस्लिम बांधवांची मस्जिद असून, पवित्र रमजान महिन्याची सुरुवात झाल्यामुळे नमाजासाठी ये-जा करताना भाविकांना या घाण पाण्यातून जावे लागत आहे, ही बाब अत्यंत गंभीर असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

ग्रामपंचायत प्रशासनाने तातडीने दखल घेऊन मुख्य रस्त्यावरील नालीचे काम त्वरित हाती घ्यावे व नागरिकांची मागणी पूर्ण करावी, अन्यथा येत्या वीस दिवसांत सहानुभूतीपूर्वक विचार न झाल्यास ग्रामपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येईल, असा इशाराही एमआयएमच्या वतीने देण्यात आला आहे.

या निवेदनावर एमआयएमचे सिराज बौडीवाले, बाबूलाल पठाण, मजरोद्दीन बौडीवाले यांच्यासह पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

GRAMIN SANWAD

graminsanwad.co.in/

The post मुख्य रस्त्यावरील सांडपाण्याचा प्रश्न ऐरणीवर; वलांडीत एमआयएम आक्रमक appeared first on ग्रामीण संवाद.