Homeताज्या बातम्यादेवणी येथे डिव्हायडरला कारची जोरदार धडक; चालक विवेक टिळे किरकोळ जखमी

देवणी येथे डिव्हायडरला कारची जोरदार धडक; चालक विवेक टिळे किरकोळ जखमी

प्रतिनिधी | वलांडी

देवणी येथे ३० मार्च रोजी सायंकाळी सुमारे ९.३० वाजता वेगाने जात असलेली एमएच १२ पीटी ७०८९ क्रमांकाची मारुती सुजुकी विटारा ब्रेझा कार अचानक नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या डिव्हायडरवर जाऊन आदळली. धडक एवढी जोरदार होती की कारचे पुढील छत आणि विंडस्क्रीन पूर्णतः चकनाचूर झाले. या अपघातात चालक विवेक टिळे (रा. दवणहिप्परगा) हे किरकोळ जखमी झाले आहेत.

अपघाताच्या धडकेनंतर कार पलटी झाली होती. मात्र स्थानिक नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत वाहन सरळ केले. एअरबॅग वेळेवर उघडल्याने विवेक टिळे यांचा जीव थोडक्यात बचावला. अपघाताच्या वेळी ते एकटेच प्रवास करत असल्याने मोठी जीवितहानी टळली.

जखमी चालकाला नागरिकांच्या मदतीने तातडीने ग्रामीण रुग्णालय, देवणी येथे हलवण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.

घटनास्थळी देवणी पोलिसांनी त्वरित भेट देत वाहतूक सुरळीत केली. प्राथमिक माहितीप्रमाणे वाहनाचा ताबा सुटल्याने हा अपघात घडल्याचा अंदाज आहे.

ड्रीम कन्स्ट्रक्शनचा भोंगळ कारभार – नागरिकांचा संताप वाढला——–

या अपघातानंतर पुन्हा एकदा ड्रीम कन्स्ट्रक्शनच्या ढिसाळ आणि भोंगळ कामकाजावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. अर्धवट रस्ते, असमान डांबरीकरण, चेतावणी फलकांचा अभाव आणि नीट न केलेल्या डिव्हायडरमुळे वारंवार अपघात घडत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

“ड्रीम कन्स्ट्रक्शनचा निष्काळजी कारभार आणखी किती जीव धोक्यात घालणार? प्रशासनाला अजून किती अपघातांची वाट पाहायची आहे?”

रस्त्यांच्या दुरवस्थितीकडे प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप होत असून संबंधित ठेकेदारावर कारवाईची जोरदार मागणी स्थानिकांकडून होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

City’s biggest goodbye, cops’ longest shift: The human cost of Ganpati visarjan duty |...

0
With elaborate arrangements in place, Maharashtra is all set to bid goodbye to Bappa this year (Photo credit: Uma Kadam) PUNE: “Mi majhya...

SPPU ने कॅश फॉर डिग्री घोटाळ्यात पोलिस तक्रार दाखल केली, कर्मचाऱ्याला निलंबित केले. पुणे...

0
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने पदवी प्रमाणपत्राच्या कथित रोख रकमेप्रकरणी बुधवारी पोलिसात तक्रार दाखल केली, ज्यामध्ये विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यावर...

मी पायउतार होण्यापूर्वी सर्व मुद्दे निकाली काढले होते: माजी DLTA प्रमुख अनिल खन्ना |...

0
पुणे: ऑल इंडिया टेनिस असोसिएशन (AITA) तसेच दिल्ली लॉन टेनिस असोसिएशन (DLTA) चे माजी अध्यक्ष अनिल खन्ना यांनी बुधवारी सांगितले की, DLTA...

स्टेकहोल्डर्सची दिल्लीत बैठक झाली, पण राष्ट्रवादीचे विलीनीकरण नाही असे पवार म्हणतात. पुणे बातम्या

0
शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस (एसपी) एनडीएशी हातमिळवणी करणार असल्याच्याही अटकळ सुरू आहेत. पुणे : ज्येष्ठ राजकारणी शरद पवार यांनी मंगळवारी नवी दिल्लीत...

कायदेशीर नोटीस AITA आणि DLTA च्या निष्कासनासाठी कॉल करते. पुणे बातम्या

0
पुणे: अडचणीत सापडलेल्या ऑल इंडिया टेनिस असोसिएशन (एआयटीए) आणि दिल्ली लॉन टेनिस असोसिएशनला मंगळवारी दिल्लीच्या भूमी आणि विकास अधिकारी (एल अँड डीओ)...

error: Content is protected !!