Homeराजकीयवलांडी येथे भारतीय जनता पार्टीची जाहीर सभा संपन्न

वलांडी येथे भारतीय जनता पार्टीची जाहीर सभा संपन्न

वलांडी | प्रतिनिधी

तालुक्यातील वलांडी येथे शनिवार, दि. ३१ जानेवारी रोजी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक प्रचारासाठी दोन प्रमुख राजकीय पक्षांच्या जाहीर सभांचे आयोजन करण्यात आले होते. वंचित बहुजन आघाडीची सभा निलंगा–उदगीर राज्य मार्गावरील मुख्य चौकात सायंकाळी ६ वाजता पार पडली, तर भारतीय जनता पार्टीची सभा ५ वाजता गावातील मुख्य बाजारपेठेत आयोजित करण्यात आली होती.

भाजपच्या सभेला आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी प्रमुख वक्ते म्हणून संबोधित केले. यावेळी भाजप प्रदेश सचिव अरविंद पाटील निलंगेकर, जिल्हा परिषद माजी समाजकल्याण सभापती संजय दोरवे, तालुकाध्यक्ष बिरादार, जिल्हा बँकेचे संचालक भगवान पाटील तळेगावकर, विकास सोसायटीचे चेअरमन व्यंकटराव पाटील यांच्यासह वलांडी गटाच्या उमेदवार उषाबाई पाटील, वलांडी गणाचे बाळासाहेब पाटील, विळेगाव गणाचे विजयकुमार बोरोळे तसेच तालुक्यातील प्रमुख भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सभेत बोलताना आमदार संभाजी पाटील यांनी काँग्रेसचे स्टार प्रचारक अमित देशमुख यांच्यावर टीका करत, “माझ्यावर होत असलेले आरोपांचे भाषण त्वरित थांबवावे, अन्यथा मी लातूर येथे पत्रकार परिषद घेऊन या आरोपांचे खंडन करीन,” असा इशारा दिला.

यावेळी त्यांनी साखर कारखान्यांच्या विषयावर भाष्य करत सांगितले की, या भागात जागृती साखर कारखान्याला ओंकार साखर कारखाना स्पर्धक म्हणून उभा राहिल्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फायदा होऊ लागला आहे. ओंकार कारखाना शेतकरी सभासदांना मोफत साखर वाटप करतो, तर जागृती साखर कारखाना २५ रुपये प्रति किलो दराने साखर देतो, असे आरोपही त्यांनी यावेळी केले.

वलांडी बाजारपेठ ही जिल्ह्यातील दहा प्रमुख बाजारपेठांपैकी एक असून, येथे कृषी उत्पन्न बाजार समिती देण्याचे आश्वासन आमदार संभाजी पाटील यांनी दिले. तसेच जिल्हा परिषदेत भाजपची सत्ता आल्यास वलांडीचा स्वतंत्र स्वीकृत सदस्य म्हणून समावेश करण्यात येईल, असेही त्यांनी जाहीर केले. जिल्हा परिषदेत भाजपची सत्ता आल्यानंतर अंगणवाडी इमारतींच्या निर्मितीला गती मिळाल्याचे त्यांनी नमूद केले.

शेवटी त्यांनी सुजाण मतदारांना आवाहन करत येत्या ७ तारखेला कमळाच्या चिन्हासमोरील बटण दाबून भारतीय जनता पार्टीच्या तिन्ही उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करण्याची विनंती केली.

सभेचे सूत्रसंचालन प्रशांत पाटील दवणहिप्परगेकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन अँड. दत्ता पाटील यांनी मानले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

City’s biggest goodbye, cops’ longest shift: The human cost of Ganpati visarjan duty |...

0
With elaborate arrangements in place, Maharashtra is all set to bid goodbye to Bappa this year (Photo credit: Uma Kadam) PUNE: “Mi majhya...

SPPU ने कॅश फॉर डिग्री घोटाळ्यात पोलिस तक्रार दाखल केली, कर्मचाऱ्याला निलंबित केले. पुणे...

0
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने पदवी प्रमाणपत्राच्या कथित रोख रकमेप्रकरणी बुधवारी पोलिसात तक्रार दाखल केली, ज्यामध्ये विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यावर...

मी पायउतार होण्यापूर्वी सर्व मुद्दे निकाली काढले होते: माजी DLTA प्रमुख अनिल खन्ना |...

0
पुणे: ऑल इंडिया टेनिस असोसिएशन (AITA) तसेच दिल्ली लॉन टेनिस असोसिएशन (DLTA) चे माजी अध्यक्ष अनिल खन्ना यांनी बुधवारी सांगितले की, DLTA...

स्टेकहोल्डर्सची दिल्लीत बैठक झाली, पण राष्ट्रवादीचे विलीनीकरण नाही असे पवार म्हणतात. पुणे बातम्या

0
शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस (एसपी) एनडीएशी हातमिळवणी करणार असल्याच्याही अटकळ सुरू आहेत. पुणे : ज्येष्ठ राजकारणी शरद पवार यांनी मंगळवारी नवी दिल्लीत...

कायदेशीर नोटीस AITA आणि DLTA च्या निष्कासनासाठी कॉल करते. पुणे बातम्या

0
पुणे: अडचणीत सापडलेल्या ऑल इंडिया टेनिस असोसिएशन (एआयटीए) आणि दिल्ली लॉन टेनिस असोसिएशनला मंगळवारी दिल्लीच्या भूमी आणि विकास अधिकारी (एल अँड डीओ)...

error: Content is protected !!