Homeराजकीयरसिका शैक्षणिक संकुलाकडून गजानन भोपणीकर यांचा गौरवपूर्ण सत्कार

रसिका शैक्षणिक संकुलाकडून गजानन भोपणीकर यांचा गौरवपूर्ण सत्कार

देवणी / प्रतिनिधी

नुकत्याच पार पडलेल्या पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये देवणी तालुक्यातील बोरोळ पंचायत समिती गणातून विक्रमी मताधिक्याने विजयी झाल्याबद्दल रसिका शैक्षणिक संकुलाच्या वतीने श्री. गजानन गोविंदराव बिरादार (भोपणीकर) यांचा भव्य सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला.

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मा. श्री. गोविंदरावजी भोपणीकर यांनी भूषविले. यावेळी मंचावर रामराव काका भोपणीकर, कुशावर्ता ताई बेळे, सत्यदेव गरड, प्रताप कोयले, प्रीतम आष्टुरे आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. चंद्रकांत जावळे यांनी केले. तसेच रसिका महाविद्यालयातील असोसिएट प्रोफेसरपदी पदोन्नती मिळालेल्या डॉ. विजयकुमार मोरे, डॉ. सुदर्शन पेडगे, डॉ. सुलोचना डेंगाळे आणि डॉ. वैशाली चटगे या प्राध्यापकांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.

देवणी पंचायत समिती सदस्यपदी निवड झाल्याबद्दल श्री. रामदास नागराळे, सत्यदेव गरड, डॉ. प्रशांत भंडे व डॉ. सुदर्शन पेडगे यांनी मनोगत व्यक्त करत भोपणीकर यांच्या कार्याची प्रशंसा केली.

सत्काराला उत्तर देताना श्री. गजानन भोपणीकर म्हणाले की, “बोरोळ गणातील सर्व गावांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी पंचायत समितीच्या माध्यमातून विविध योजना प्रभावीपणे राबविणार असून सर्वसामान्यांच्या समस्या सोडवण्यासाठी नेहमी तत्पर राहीन.” तसेच मोठ्या बहुमताने विजयी केल्याबद्दल त्यांनी मतदार व कार्यकर्त्यांचे आभार मानले.

रसिका शैक्षणिक संकुलातील कै. रसिका महाविद्यालय, आबासाहेब इंग्लिश स्कूल, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अभ्यासकेंद्र, वस्तीगृह, वाहतूक विभाग व इतर कर्मचारी वर्गाच्या वतीनेही त्यांचा सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमास काशिनाथ शेंडगे मामा, दत्ता हुरूचनाळे, सौ. महानंदा मुराळे, श्याम रणदिवे, शिवाजी मोतीरावे, नारायण मोरे, रोहित बंडगर, प्रशांत घोलपे, नीलकंठ बिरादार, सरफराज मणियार, आकाश बिरादार यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते.

सूत्रसंचालन सौ. शुभांगी माने यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. शिवाजी सोनटक्के यांनी मानले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

City’s biggest goodbye, cops’ longest shift: The human cost of Ganpati visarjan duty |...

0
With elaborate arrangements in place, Maharashtra is all set to bid goodbye to Bappa this year (Photo credit: Uma Kadam) PUNE: “Mi majhya...

SPPU ने कॅश फॉर डिग्री घोटाळ्यात पोलिस तक्रार दाखल केली, कर्मचाऱ्याला निलंबित केले. पुणे...

0
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने पदवी प्रमाणपत्राच्या कथित रोख रकमेप्रकरणी बुधवारी पोलिसात तक्रार दाखल केली, ज्यामध्ये विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यावर...

मी पायउतार होण्यापूर्वी सर्व मुद्दे निकाली काढले होते: माजी DLTA प्रमुख अनिल खन्ना |...

0
पुणे: ऑल इंडिया टेनिस असोसिएशन (AITA) तसेच दिल्ली लॉन टेनिस असोसिएशन (DLTA) चे माजी अध्यक्ष अनिल खन्ना यांनी बुधवारी सांगितले की, DLTA...

स्टेकहोल्डर्सची दिल्लीत बैठक झाली, पण राष्ट्रवादीचे विलीनीकरण नाही असे पवार म्हणतात. पुणे बातम्या

0
शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस (एसपी) एनडीएशी हातमिळवणी करणार असल्याच्याही अटकळ सुरू आहेत. पुणे : ज्येष्ठ राजकारणी शरद पवार यांनी मंगळवारी नवी दिल्लीत...

कायदेशीर नोटीस AITA आणि DLTA च्या निष्कासनासाठी कॉल करते. पुणे बातम्या

0
पुणे: अडचणीत सापडलेल्या ऑल इंडिया टेनिस असोसिएशन (एआयटीए) आणि दिल्ली लॉन टेनिस असोसिएशनला मंगळवारी दिल्लीच्या भूमी आणि विकास अधिकारी (एल अँड डीओ)...

error: Content is protected !!