शिक्षण-प्रशिक्षण Archives - ग्रामीण संवाद

कडक बंदोबस्तात दहावीचा इंग्रजी पेपर निर्विघ्न; वलांडी केंद्रावर कॉपीमुक्त परीक्षेची यशस्वी अंमलबजावणी
सीसीटीव्ही देखरेख, दक्ष पथकांची थेट नजर आणि प्रशासनाचा समन्वय; २९४ विद्यार्थ्यांची शांततेत परीक्षा

वलांडी | मुकेश कांबळे

देवणी तालुक्यातील वलांडी येथे दहावी शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा इंग्रजी विषयाचा पेपर अत्यंत शांत, शिस्तबद्ध आणि पारदर्शक वातावरणात पार पडला. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांच्या वतीने २० फेब्रुवारी २०२६ पासून सुरू झालेल्या या परीक्षेमध्ये इंग्रजी विषयाला विशेष शैक्षणिक महत्त्व असल्याने विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये उत्सुकता होती. विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी सुट्टी दिल्यानंतर २७ फेब्रुवारी रोजी झालेला हा पेपर कोणताही अनुचित प्रकार न घडता सुरळीत पार पडल्याने प्रशासनाने समाधान व्यक्त केले आहे.

वलांडी येथील सौ. अनुसयादेवी सोनकवडे विद्यालय येथे परीक्षा केंद्र क्रमांक ४१३६ निश्चित करण्यात आले होते. या केंद्रावर एकूण २९६ विद्यार्थ्यांची नोंदणी झाली होती. त्यापैकी २ विद्यार्थी अनुपस्थित राहिले, तर २९४ विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परीक्षेला हजेरी लावली. विशेष बाब म्हणजे एका दिव्यांग विद्यार्थ्यास शासन नियमांनुसार आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या, ज्यामुळे त्यालाही आत्मविश्वासाने परीक्षा देता आली.

परीक्षा पूर्णतः कॉपीमुक्त आणि पारदर्शक व्हावी यासाठी केंद्रावरील सर्व १२ परीक्षा कक्षांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित ठेवण्यात आले होते. जिल्हा दक्ष पथकाच्या नियंत्रणाखाली दूरदृश्य प्रणालीद्वारे प्रत्येक कक्षावर थेट लक्ष ठेवण्यात आले. संशयास्पद हालचाल आढळल्यास तात्काळ केंद्रप्रमुखांना सूचना देऊन आवश्यक ती कारवाई करण्याची व्यवस्था सज्ज ठेवण्यात आली होती. या आधुनिक देखरेखीमुळे परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता आणि शिस्त राखण्यात मोठी मदत झाली.

महसूल प्रशासन, पोलीस यंत्रणा, सीसीटीव्ही नियंत्रण कक्ष, बैठे पथक, भरारी पथक आणि जिल्हा दक्ष पथक यांच्या संयुक्त समन्वयातून केंद्रावर चोख बंदोबस्त ठेवण्यात आला. जिल्हाधिकारी वर्षा घुगे ठाकूर यांनी परीक्षा काळात कोणताही गैरप्रकार सहन केला जाणार नसल्याचे स्पष्ट निर्देश दिले होते. कॉपी किंवा अन्य अनुचित प्रकार आढळल्यास संबंधित केंद्राविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही प्रशासनाने दिला होता.

केंद्रप्रमुख राजेंद्र हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण परीक्षा प्रक्रिया शासनाच्या नियमावलीनुसार काटेकोर राबविण्यात आली. केंद्रावर १२ पर्यवेक्षक आणि २ सहाय्यक कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. महसूल विभागातील मंडळ अधिकारी तसेच अन्य अधिकाऱ्यांनी वेळोवेळी भेट देऊन परीक्षा व्यवस्थेची पाहणी केली आणि सर्व बाबींची खातरजमा केली.

एकूणच, कडक सुरक्षा, तांत्रिक देखरेख आणि प्रशासनाच्या सतर्क भूमिकेमुळे इंग्रजी विषयाची परीक्षा शांततेत आणि शिस्तीत पूर्ण झाली. विद्यार्थ्यांनीही कोणत्याही अफवांना बळी न पडता नियमांचे पालन करत आत्मविश्वासाने परीक्षा दिली. उर्वरित पेपरही याच पद्धतीने सुरळीत पार पडावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

GRAMIN SANWAD

graminsanwad.co.in

The post कडक बंदोबस्तात दहावीचा इंग्रजी पेपर निर्विघ्न; वलांडी केंद्रावर कॉपीमुक्त परीक्षेची यशस्वी अंमलबजावणी appeared first on ग्रामीण संवाद.

दहावी बोर्ड परीक्षा सुरू; सीसीटीव्ही व दक्ष पथकांचा चोख पहारा
प्रतिनिधी / वलांडी

देवणी तालुक्यात शुक्रवार, दिनांक २० फेब्रुवारी २०२६ पासून महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांच्या वतीने घेण्यात येणाऱ्या दहावी शालांत प्रमाणपत्र परीक्षेला सुरुवात झाली आहे. पहिल्या दिवशी मराठी विषयाचा पेपर शांततेत व सुरळीत पार पडला.

मराठी विषयाला विशेष महत्त्व असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य या परीक्षेवर अवलंबून असते. त्यामुळे परीक्षा प्रक्रिया पारदर्शक, शिस्तबद्ध व कॉपीमुक्त राहावी यासाठी प्रशासनाकडून कडक उपाययोजना राबविण्यात आल्या आहेत.

परीक्षा केंद्रावरील १२ परीक्षा हॉलमध्ये सी.सी.टी.व्ही. कॅमेरे कार्यान्वित करण्यात आले असून, जिल्हा दक्ष पथकाच्या माध्यमातून दूरदृश्य प्रणालीद्वारे (झूम ॲप कॅमेरा संदेश प्रणाली) थेट नियंत्रण ठेवण्यात येत आहे. कोणत्याही परीक्षा कक्षात संशयास्पद हालचाल आढळल्यास संबंधित केंद्रप्रमुखांना तत्काळ सूचना देऊन चौकशी व आवश्यक कारवाई केली जात आहे.

परीक्षेदरम्यान कोणताही गैरप्रकार घडू नये यासाठी महसूल प्रशासन, पोलीस प्रशासन, सी.सी.टी.व्ही. नियंत्रण यंत्रणा, बैठे पथक, भरारी पथक व जिल्हा दक्ष पथक यांच्या समन्वयातून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

वर्षा घुगे-ठाकूर जिल्हाधिकारी यांनी परीक्षा काळात कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार सहन केला जाणार नाही, अशा स्पष्ट व कठोर सूचना संबंधित यंत्रणांना दिल्या आहेत. एखाद्या परीक्षा केंद्रावर कॉपी अथवा अनुचित प्रकार आढळून आल्यास त्या केंद्राची मान्यता रद्द करण्याची कठोर कारवाई करण्यात येईल, असे आदेशही देण्यात आले आहेत.

वलांडी येथील सौ. अनुसयादेवी सोनकवडे विद्यालय येथे दहावी बोर्ड परीक्षेचे केंद्र असून, या केंद्रावर सात विद्यालयांतील विद्यार्थी परीक्षा देत आहेत. परीक्षा केंद्र क्रमांक ४१३६ वर एकूण २८७ विद्यार्थी नोंदणीकृत होते. यामध्ये विष्णू डूब्बे हा एक दिव्यांग विद्यार्थी असून, दोन विद्यार्थी अनुपस्थित राहिल्याने २८५ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली.

केंद्रप्रमुख म्हणून राजेंद्र हजारे हे शासनाच्या नियमावलीनुसार शिस्तबद्ध पद्धतीने परीक्षा पार पाडत आहेत. या परीक्षा केंद्रावर १२ पर्यवेक्षक व २ सहाय्यक कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. तसेच बैठे पथक प्रमुख शेरसांडे आर. टी., सुतार डी. एम. (ग्रामपंचायत अधिकारी), करमले ज्ञानोबा (तलाठी), दायमी एस. एम. (विशेष शिक्षक) व प्रविण बेंडे (तंत्रस्नेही) यांनी ठाण मांडून परीक्षा प्रक्रियेवर काटेकोर देखरेख ठेवली.

सी.सी.टी.व्ही. कॅमेऱ्यांच्या सततच्या निरीक्षणाखाली परीक्षा सुरळीत व शांततेत पार पडली असून, विद्यार्थ्यांनी कोणत्याही अफवांना बळी न पडता नियमांचे काटेकोर पालन करून आत्मविश्वासाने परीक्षा द्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

GRAMIN SANWAD

graminsanwad.co.in/

The post दहावी बोर्ड परीक्षा सुरू; सीसीटीव्ही व दक्ष पथकांचा चोख पहारा appeared first on ग्रामीण संवाद.

बारावी बोर्ड विज्ञान शाखेच्या परीक्षेला प्रारंभ
वलांडी प्रतिनिधी

देवणी तालुक्यात मंगळवार, दिनांक १० फेब्रुवारी २०२६ पासून महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांच्या वतीने घेण्यात येणाऱ्या बारावी शालांत प्रमाणपत्र परीक्षेला सुरुवात झाली आहे. आज विज्ञान शाखेतील भौतिकशास्त्र ( फिजीक्स)विषयाचा पहिला पेपर पार पडला.

विज्ञान शाखेत गुणांना विशेष महत्त्व असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य या परीक्षेवर अवलंबून असते. त्यामुळे परीक्षा प्रक्रिया पारदर्शक, शिस्तबद्ध व कॉपीमुक्त राहावी, यासाठी प्रशासनाकडून कडक उपाययोजना करण्यात आल्या आहेत.

जिल्ह्यातील १०१ परीक्षा केंद्रांवर सी.सी.टी.व्ही. कॅमेरे कार्यान्वित करण्यात आले असून, जिल्हा दक्ष पथकाच्या माध्यमातून सर्व केंद्रांवर दूरदृश्य प्रणालीद्वारे थेट नियंत्रण ठेवण्यात येत आहे. कोणत्याही परीक्षा कक्षात संशयास्पद हालचाल आढळल्यास संबंधित केंद्रप्रमुखांना तत्काळ सूचना देऊन चौकशी व आवश्यक कारवाई केली जात आहे.

वर्षा घुगे-ठाकूर जिल्हाधिकारी यांनी परीक्षा काळात कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार घडू नये, यासाठी संबंधित यंत्रणांना स्पष्ट व कठोर सूचना दिल्या आहेत. एखाद्या परीक्षा केंद्रावर कॉपी अथवा अनुचित प्रकार आढळून आल्यास त्या केंद्राची मान्यता रद्द करण्याची कठोर कारवाई करण्यात येईल, असे आदेशही देण्यात आले आहेत.

वलांडी येथील श्री वेंकटेश महाविद्यालय येथे बारावी बोर्ड परीक्षेचे केंद्र असून, केंद्रप्रमुख म्हणून भोसले यु. एम. हे शासनाच्या नियमावलीनुसार शिस्तबद्ध पद्धतीने परीक्षा पार पाडत आहेत. परीक्षा केंद्र क्रमांक ०६०७ वर एकूण ३२४ विद्यार्थी नोंदणीकृत होते. त्यापैकी १ विद्यार्थी गैरहजर राहिल्याने ३२३ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली.

या केंद्रावर १३ पर्यवेक्षक व २ सहाय्यक कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. तसेच बैठे पथक प्रमुख बालाजी केंद्रे (मंडळ अधिकारी), माधव सगर (ग्रामपंचायत अधिकारी), डी. डी. पवार (महसूल अधिकारी), साबणे एस. बी. (शिक्षण केंद्रप्रमुख), वजनम आर. आर. (साधन व्यक्ती) आदी अधिकारी उपस्थित होते. भरारी पथकात बिराजदार (सहाय्यक गटविकास अधिकारी, औसा) व साखरे ए. बी. (विस्तार अधिकारी, औसा) यांनी ठाण मांडून परीक्षा प्रक्रियेवर देखरेख ठेवली.

सी.सी.टी.व्ही. कॅमेऱ्यांच्या माध्यमातून परीक्षा सुरळीत व शांततेत पार पडली. विद्यार्थ्यांनी कोणत्याही अफवांना बळी न पडता नियमांचे काटेकोर पालन करून आत्मविश्वासाने परीक्षा द्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

GRAMIN SANWAD

graminsanwad.co.in/

The post बारावी बोर्ड विज्ञान शाखेच्या परीक्षेला प्रारंभ appeared first on ग्रामीण संवाद.

ब्ल्यूबेल पोदार लर्न स्कूल मध्ये हुतात्मा दिनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना अभिवादन
वलांडी प्रतिनिधी

दि. 30 जानेवारी 2026 रोजी ब्ल्यूबेल पोदार लर्न स्कूल, वलांडी येथे महात्मा गांधी यांच्या स्मरणार्थ हुतात्मा दिवस साजरा करण्यात आला. यावेळी

शाळेचे प्राचार्य विनोज पी. बी. यांनी “हा दिवस केवळ श्रद्धांजलीचा नसून स्वातंत्र्यवीरांच्या त्यागाची जाणीव ठेवून देशप्रेमाची भावना जागृत करण्याचा दिवस आहे.” असे मत व्यक्त केले.तसेच शाळेतील सर्व विद्यार्थी शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी महात्मा गांधींच्या स्मृतिप्रीत्यर्थ 2 मिनिटे मौन पाळून व महात्मा गांधी यांच्या स्मृतीस पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले .त्याचबरोबर संस्थाअध्यक्ष अमित पोस्ते आणि शंकर पोस्ते, लक्ष्मीकांत पोस्ते , अरुण पोस्ते, माधव हूडे, मल्लिकार्जुन हूडे, अमोल आंबेगावे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि प्राचार्यांच्या नेतृत्वात ‘सर्वोदय व स्वच्छता’ अभियानावर विशेष भर देत विविध उपक्रम शाळेत राबविण्यात आले.

GRAMIN SANWAD

graminsanwad.co.in/

The post ब्ल्यूबेल पोदार लर्न स्कूल मध्ये हुतात्मा दिनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना अभिवादन appeared first on ग्रामीण संवाद.

अनुभव शिक्षा केंद्राच्या वतीने अनंतवाडी येथे संविधान प्रश्नमंजुषा कार्यक्रम उत्साहात संपन्न…….
वलांडी/ प्रतिनिधी

२६ जानेवारी हा दिवस आपण गणतंत्र दिवस म्हणून राष्ट्रीय सणाच्या स्वरूपात साजरा करतो. याच अनुषंगाने यंदा आपल्या भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आनंतवाडी येथे संविधानाबद्दल जनजागृती व्हावी, संविधानिक मूल्यांची ओळख निर्माण व्हावी आणि २६ जानेवारी हा सण आपण नेमका कशासाठी साजरा करतो याची जाणीव सर्वांना व्हावी या उद्देशाने संविधान प्रश्नमंजुषा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमात एकजूट अनुभव कट्ट्यातील युवकांनी तसेच विद्यार्थ्यांनी व ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. भारतीय संविधानाची निर्मिती, उद्देशिका, मूलभूत हक्क व कर्तव्ये, तसेच समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि सामाजिक न्याय या मूल्यांवर आधारित प्रश्न विचारण्यात आले. सहभागी स्पर्धकांनी उत्साहाने उत्तरे देत संविधानाबद्दलची आपली जाण अधिक दृढ केली.

या उपक्रमातून संविधान हे केवळ पुस्तक नसून आपल्या देशाच्या लोकशाहीचा पाया आहे, तसेच प्रत्येक नागरिकाने संविधानिक मूल्ये आपल्या दैनंदिन जीवनात आचरणात आणली पाहिजेत, असा संदेश देण्यात आला. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व उपस्थितांनी संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करून राष्ट्रीय एकात्मतेची भावना दृढ केली.

या उपक्रमामुळे अनंतवाडी परिसरात संविधानाबद्दल जागरूकता निर्माण झाली असून गणतंत्र दिनाचे औचित्य साधून हा कार्यक्रम प्रेरणादायी ठरला.

GRAMIN SANWAD

graminsanwad.co.in/

The post अनुभव शिक्षा केंद्राच्या वतीने अनंतवाडी येथे संविधान प्रश्नमंजुषा कार्यक्रम उत्साहात संपन्न……. appeared first on ग्रामीण संवाद.

ब्ल्यूबेल पोदार लर्न स्कूल मध्ये प्रजासत्ताक दिन साजरा
दि. २६ जानेवारी २०२६ रोजी ब्ल्यूबेल पोदार लर्न स्कूल, वलांडी येथे प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. संस्थेचे सदस्य शंकर पोस्ते यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी माधवराव हुडे , संगमेश्वर पोसते , अभिषेक स्वामी आणि पालकांची प्रमुख उपस्थिती होती.

शाळेचे प्राचार्य विनोज पी. बी. यांनी सदर कार्यक्रमाचे प्रस्ताविक सादर केले. तसेच शाळेतील विद्यार्थ्यानी भाषणे, देशभक्ती पर गीत गायन व नृत्य सादर करून देशप्रेम व्यक्त केले व मान्यवरांचे लक्ष वेधून घेतले.त्याचबरोबर विद्यार्थ्यांची विविध स्वातंत्र्यसैनिकांच्या वेशभूषेत राष्ट्रप्रेमाची व एकीची भावना निर्माण करत डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौकपर्यंत भव्य प्रभातफेरी काढण्यात आली .

या कार्यक्रमाचे आयोजन संस्थाअध्यक्ष अमित पोस्ते आणि शंकर पोस्ते, लक्ष्मीकांत पोस्ते , अरुण पोस्ते, माधव हूडे, मल्लिकार्जुन हूडे, अमोल आंबेगावे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि शाळेतील प्राचार्य यांच्या नेतृत्वात हा कार्यक्रम पार पडला.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थी अश्विनी गिलगिले व अब्दुल समी तर आभार उप प्राचार्या प्रगती सांगोलगे यांनी केले. या कार्यक्रमासाठी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले. तसेच यावेळी शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवून कार्यक्रमाची शोभा वाढविली.

GRAMIN SANWAD

graminsanwad.co.in/

The post ब्ल्यूबेल पोदार लर्न स्कूल मध्ये प्रजासत्ताक दिन साजरा appeared first on ग्रामीण संवाद.