Homeशिक्षण-प्रशिक्षणकडक बंदोबस्तात दहावीचा इंग्रजी पेपर निर्विघ्न; वलांडी केंद्रावर कॉपीमुक्त परीक्षेची यशस्वी अंमलबजावणी

कडक बंदोबस्तात दहावीचा इंग्रजी पेपर निर्विघ्न; वलांडी केंद्रावर कॉपीमुक्त परीक्षेची यशस्वी अंमलबजावणी

सीसीटीव्ही देखरेख, दक्ष पथकांची थेट नजर आणि प्रशासनाचा समन्वय; २९४ विद्यार्थ्यांची शांततेत परीक्षा

वलांडी | मुकेश कांबळे

देवणी तालुक्यातील वलांडी येथे दहावी शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा इंग्रजी विषयाचा पेपर अत्यंत शांत, शिस्तबद्ध आणि पारदर्शक वातावरणात पार पडला. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांच्या वतीने २० फेब्रुवारी २०२६ पासून सुरू झालेल्या या परीक्षेमध्ये इंग्रजी विषयाला विशेष शैक्षणिक महत्त्व असल्याने विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये उत्सुकता होती. विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी सुट्टी दिल्यानंतर २७ फेब्रुवारी रोजी झालेला हा पेपर कोणताही अनुचित प्रकार न घडता सुरळीत पार पडल्याने प्रशासनाने समाधान व्यक्त केले आहे.

वलांडी येथील सौ. अनुसयादेवी सोनकवडे विद्यालय येथे परीक्षा केंद्र क्रमांक ४१३६ निश्चित करण्यात आले होते. या केंद्रावर एकूण २९६ विद्यार्थ्यांची नोंदणी झाली होती. त्यापैकी २ विद्यार्थी अनुपस्थित राहिले, तर २९४ विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परीक्षेला हजेरी लावली. विशेष बाब म्हणजे एका दिव्यांग विद्यार्थ्यास शासन नियमांनुसार आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या, ज्यामुळे त्यालाही आत्मविश्वासाने परीक्षा देता आली.

परीक्षा पूर्णतः कॉपीमुक्त आणि पारदर्शक व्हावी यासाठी केंद्रावरील सर्व १२ परीक्षा कक्षांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित ठेवण्यात आले होते. जिल्हा दक्ष पथकाच्या नियंत्रणाखाली दूरदृश्य प्रणालीद्वारे प्रत्येक कक्षावर थेट लक्ष ठेवण्यात आले. संशयास्पद हालचाल आढळल्यास तात्काळ केंद्रप्रमुखांना सूचना देऊन आवश्यक ती कारवाई करण्याची व्यवस्था सज्ज ठेवण्यात आली होती. या आधुनिक देखरेखीमुळे परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता आणि शिस्त राखण्यात मोठी मदत झाली.

महसूल प्रशासन, पोलीस यंत्रणा, सीसीटीव्ही नियंत्रण कक्ष, बैठे पथक, भरारी पथक आणि जिल्हा दक्ष पथक यांच्या संयुक्त समन्वयातून केंद्रावर चोख बंदोबस्त ठेवण्यात आला. जिल्हाधिकारी वर्षा घुगे ठाकूर यांनी परीक्षा काळात कोणताही गैरप्रकार सहन केला जाणार नसल्याचे स्पष्ट निर्देश दिले होते. कॉपी किंवा अन्य अनुचित प्रकार आढळल्यास संबंधित केंद्राविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही प्रशासनाने दिला होता.

केंद्रप्रमुख राजेंद्र हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण परीक्षा प्रक्रिया शासनाच्या नियमावलीनुसार काटेकोर राबविण्यात आली. केंद्रावर १२ पर्यवेक्षक आणि २ सहाय्यक कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. महसूल विभागातील मंडळ अधिकारी तसेच अन्य अधिकाऱ्यांनी वेळोवेळी भेट देऊन परीक्षा व्यवस्थेची पाहणी केली आणि सर्व बाबींची खातरजमा केली.

एकूणच, कडक सुरक्षा, तांत्रिक देखरेख आणि प्रशासनाच्या सतर्क भूमिकेमुळे इंग्रजी विषयाची परीक्षा शांततेत आणि शिस्तीत पूर्ण झाली. विद्यार्थ्यांनीही कोणत्याही अफवांना बळी न पडता नियमांचे पालन करत आत्मविश्वासाने परीक्षा दिली. उर्वरित पेपरही याच पद्धतीने सुरळीत पार पडावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

City’s biggest goodbye, cops’ longest shift: The human cost of Ganpati visarjan duty |...

0
With elaborate arrangements in place, Maharashtra is all set to bid goodbye to Bappa this year (Photo credit: Uma Kadam) PUNE: “Mi majhya...

SPPU ने कॅश फॉर डिग्री घोटाळ्यात पोलिस तक्रार दाखल केली, कर्मचाऱ्याला निलंबित केले. पुणे...

0
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने पदवी प्रमाणपत्राच्या कथित रोख रकमेप्रकरणी बुधवारी पोलिसात तक्रार दाखल केली, ज्यामध्ये विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यावर...

मी पायउतार होण्यापूर्वी सर्व मुद्दे निकाली काढले होते: माजी DLTA प्रमुख अनिल खन्ना |...

0
पुणे: ऑल इंडिया टेनिस असोसिएशन (AITA) तसेच दिल्ली लॉन टेनिस असोसिएशन (DLTA) चे माजी अध्यक्ष अनिल खन्ना यांनी बुधवारी सांगितले की, DLTA...

स्टेकहोल्डर्सची दिल्लीत बैठक झाली, पण राष्ट्रवादीचे विलीनीकरण नाही असे पवार म्हणतात. पुणे बातम्या

0
शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस (एसपी) एनडीएशी हातमिळवणी करणार असल्याच्याही अटकळ सुरू आहेत. पुणे : ज्येष्ठ राजकारणी शरद पवार यांनी मंगळवारी नवी दिल्लीत...

कायदेशीर नोटीस AITA आणि DLTA च्या निष्कासनासाठी कॉल करते. पुणे बातम्या

0
पुणे: अडचणीत सापडलेल्या ऑल इंडिया टेनिस असोसिएशन (एआयटीए) आणि दिल्ली लॉन टेनिस असोसिएशनला मंगळवारी दिल्लीच्या भूमी आणि विकास अधिकारी (एल अँड डीओ)...

error: Content is protected !!