Homeराजकीय३ जिल्हा परिषद गटांत ११ तर ६ पंचायत समिती गणांत १७ उमेदवार...

३ जिल्हा परिषद गटांत ११ तर ६ पंचायत समिती गणांत १७ उमेदवार रिंगणात; माघारीनंतर राजकीय चित्र स्पष्ट

प्रतिनिधी –वलांडी

देवणी तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक २०२६ साठी उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात पूर्ण झाली असून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अंतिम उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. या प्रक्रियेनंतर देवणी तालुक्यातील तीन जिल्हा परिषद गटांसाठी एकूण ११ उमेदवार, तर सहा पंचायत समिती गणांसाठी १७ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. सुरुवातीला मोठ्या संख्येने अर्ज दाखल झाले असले तरी माघारीनंतर लढतींचे स्पष्ट आणि निर्णायक स्वरूप समोर आले आहे.

देवणी तालुक्यातील बोरोळ जिल्हा परिषद गटात एकूण सात उमेदवारांचे अर्ज वैध ठरले होते. त्यापैकी पाच उमेदवारांनी आपले अर्ज माघार घेतल्याने आता केवळ दोन उमेदवार अंतिम लढतीत आमनेसामने उरले आहेत. या गटात गुणाले धोंडीराज किशनराज ( भाजपा) आणि पांचाळ औदुंबर रामदास ( राष्ट्रीय कॉंग्रेस पक्ष )यांच्यात थेट आणि अटीतटीची लढत रंगणार असून या गटाकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

वलांडी जिल्हा परिषद गटात सात उमेदवारांचे अर्ज वैध ठरले होते. त्यापैकी तीन उमेदवारांनी माघार घेतल्यानंतर चार उमेदवार अंतिम रिंगणात उतरले आहेत. या गटात पाटील उषाबाई संभाजी (भारतीय जनता पार्टी), बिरादार जनाबाई तानाजी (शिवसेना – शिंदे गट), बेळकुने अंजली अजित (राष्ट्रीय काँग्रेस पक्ष) आणि गायकवाड मनीषा अविनाश (वंचित बहुजन आघाडी) यांच्यात चौरंगी लढत होणार असून पक्षीय ताकद आणि स्थानिक प्रभाव यांचा कस लागणार आहे.

जवळगा जिल्हा परिषद गटात तब्बल तेरा उमेदवारांचे अर्ज वैध ठरले होते. त्यापैकी आठ उमेदवारांनी अर्ज माघार घेतल्याने पाच उमेदवार अंतिम निवडणूक लढवणार आहेत. या गटात डगवाले विकास चनबस (राष्ट्रीय काँग्रेस), बिरादार विवेक दिलीप (राष्ट्रवादी काँग्रेस – शरद पवार गट), भोसले सूर्यकांत नामदेवराव (शिवसेना – शिंदे गट), माने कालिदास शामराव (राष्ट्रवादी काँग्रेस – अजित पवार गट) शेरे रामलिंग शेषेराव (भारतीय जनता पार्टी) यांच्यात बहुकोनी आणि अत्यंत चुरशीची लढत होणार आहे.

दरम्यान, देवणी पंचायत समितीच्या सहा गणांसाठीही निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाली असून एकूण १७ उमेदवार अंतिम यादीत आहेत. तळेगाव गणात चार उमेदवार वैध ठरले होते. त्यापैकी दोन उमेदवारांनी माघार घेतल्याने आता चामले प्रणिता रोहित (राष्ट्रीय काँग्रेस) आणि हंचनाळे अश्विनी सुनील (भारतीय जनता पार्टी) यांच्यात थेट लढत होणार आहे.

बोरोळ गणात आठ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले होते. चार उमेदवारांनी माघार घेतल्यानंतर पाटील प्रमोद मनोहर (भाजपा), बालूरे राहुल केशवराव (राष्ट्रीय काँग्रेस), बिरादार गजानन गोविंदराव (राष्ट्रवादी काँग्रेस – अजित पवार गट) सूर्यवंशी रजनीकांत व्यंकटराव (वंचित बहुजन आघाडी) हे चार उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत.

विळेगाव गणात आठ उमेदवार वैध ठरले होते. त्यापैकी सहा उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने आता बोराळे विजयकुमार मल्लाप्पा (भाजपा) आणि सगर नागनाथ दत्तात्रय (राष्ट्रीय काँग्रेस) यांच्यात सरळ लढत होणार आहे.

वलांडी गणात तब्बल अकरा उमेदवारांचे अर्ज वैध ठरले होते. आठ उमेदवारांनी माघार घेतल्यानंतर पाटील बाळासाहेब माधवराव (भारतीय जनता पार्टी), बिरादार उमेश अमृतराव (राष्ट्रीय काँग्रेस) मुंजेवार यासीन अखिलमिया (वंचित बहुजन आघाडी) हे तीन उमेदवार अंतिम लढतीत आहेत.

जवळगा गणात आठ उमेदवार वैध ठरले होते. चार उमेदवारांनी माघार घेतल्याने पाटोळे महादेवी शंकर (भाजपा), मोरे अर्चना दत्ता (राष्ट्रवादी काँग्रेस – अजित पवार गट), सोनकांबळे सुरेखा यशवंत (राष्ट्रीय काँग्रेस) जिरे भाग्यश्री गंगाधर (वंचित बहुजन आघाडी) यांच्यात चौरंगी लढत होणार आहे.

तर दवनहिप्परगा गणात चार उमेदवार वैध ठरले होते. त्यापैकी दोन उमेदवारांनी माघार घेतल्याने पाटील अंकिता सुशांत (भाजपा) आणि पाटील प्रभावती ज्ञानोबा (राष्ट्रीय काँग्रेस) हे दोन उमेदवार आपले नशीब आजमावणार आहेत.

एकूणच देवणी तालुक्यातील तीन जिल्हा परिषद गट आणि सहा पंचायत समिती गणांसाठीची उमेदवारी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर खरी निवडणूक रणधुमाळी सुरू होणार आहे. पक्षीय ताकद, स्थानिक समीकरणे, विकासाचे मुद्दे आणि व्यक्तिगत संपर्क यावर ही निवडणूक अवलंबून राहणार असून देवणी तालुक्यातील राजकीय वातावरण पूर्णपणे तापले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

कॉसमॉस बँकेच्या माजी अध्यक्षांचे निधन | पुणे बातम्या

0
पुणे : कॉसमॉस कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेडचे ​​माजी अध्यक्ष मुकुंद अभ्यंकर यांचे गुरुवारी निधन झाले. ते 89 वर्षांचे होते. त्यांना 1978 मध्ये बँकेच्या...

भोरमध्ये अन्न प्रक्रिया केंद्र, व्यवहार्यता तपासण्यासाठी सरकारची मुख्यमंत्र्यांची नजर. पुणे बातम्या

0
पुणे : भोर तालुक्याला अन्न प्रक्रिया विशेष आर्थिक क्षेत्र (एसईझेड) किंवा निर्यात केंद्र म्हणून विकसित करण्याच्या व्यवहार्यतेची सरकार तपासणी करेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...

पहिली CBSE इयत्ता पुण्यातील विद्यार्थ्यांनी चांगला निकाल लावला | पुणे बातम्या

0
पुणे/मुंबई: सीबीएसई इयत्तामुलींनी पुन्हा एकदा मुलांपेक्षा 95% उत्तीर्ण होण्याचे प्रमाण 92.7% विरुद्ध नोंदवले. ट्रान्सजेंडर विद्यार्थ्यांचा उत्तीर्ण होण्याचा दर 87.5% आहे.पुण्यातील शाळांनी उच्च...

नाशिक टीसीएस प्रकरण: इन्फोसिसने पुणे छेडछाडीच्या आरोपांवर निवेदन जारी केले; नाशिक टीसीएस प्रकरणानंतर छाननीत...

0
पुणे: आयटी क्षेत्रातील प्रमुख इन्फोसिसने बुधवारी त्यांच्या पुण्यातील बिझनेस प्रोसेस मॅनेजमेंट (बीपीएम) सुविधेवर कामाच्या ठिकाणी छळवणूक केल्याच्या सोशल मीडियाच्या आरोपांना औपचारिक प्रतिसाद...

रहिवाशांच्या तक्रारींनंतर पीएमसीने तीन महिन्यांत पुण्यातील 30 आरएमसी प्लांटवर कारवाई केली. पुणे बातम्या

0
पुणे: नागरिकांच्या अनेक तक्रारींनंतर नागरी संस्थेने शहरातील रेडी मिक्स काँक्रीट प्लांट्स विरोधात मोहीम तीव्र केली आहे. गेल्या तीन महिन्यांत, पुणे महानगरपालिकेने (पीएमसी)...

error: Content is protected !!