Homeक्राईमगोंडगाव येथे तरुणावर जिवघेणा हल्ला ;देवणी पोलीसांत चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

गोंडगाव येथे तरुणावर जिवघेणा हल्ला ;देवणी पोलीसांत चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

वलांडी प्रतिनिधी

देवणी तालुक्यातील गोंडगाव (विजयनगर) येथे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर दि ९ फेब्रुवारी रोजी एका तरुणावर जिवघेणा हल्ला झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी ११ फेब्रुवारी रोजी देवणी पोलीस स्टेशन येथे गावातील चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

देवणी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मौजे गोंडगाव येथील फिर्यादी मूजीबखान वहाबखान पटेल वय ३१ (रा. गोंडगाव, ता. देवणी) हे दि. ९ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ ते ८ वाजण्याच्या सुमारास आपल्या घरासमोरील ओट्यावर बसले असताना गावातील आरोपी राजकुमार बिरादार, सदानंद बोरोळे, केशव बिरादार व विजयकुमार बोरोळे (सर्व रा. गोंडगाव, विजयनगर) यांनी “तू आमच्याविरुद्ध प्रचार का केलास व आम्हाला मतदान का केले नाहीस?” असे म्हणत शिवीगाळ सुरू केली.

फिर्यादी यांनी मतदान करणे हा आपला संवैधानिक अधिकार असल्याचे सांगितल्याने आरोपींनी त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यावेळी आरोपी सदानंद बोरोळे यांनी हातातील कोयत्याने मानेवर वार करण्याचा प्रयत्न केला. बचावासाठी डावा हात पुढे केल्याने फिर्यादीच्या तळहातास गंभीर दुखापत झाली. तसेच आरोपी राजकुमार बिरादार याने “कोयत्याने मारून खल्लास कर” अशी धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

घटनेदरम्यान फिर्यादीने आरडाओरड केल्याने गावातील ग्रामस्थांनी धाव घेत भांडण सोडवले. त्यानंतर फिर्यादी तक्रार दाखल करण्यासाठी देवणी पोलीस ठाण्यात गेले असता त्यांना शासकीय रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले.

या प्रकरणी दि ११ फेब्रुवारी फिर्यादीच्या तक्रारीवरून वरील चौघांविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(२) व ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास देवणी पोलीस करीत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

City’s biggest goodbye, cops’ longest shift: The human cost of Ganpati visarjan duty |...

0
With elaborate arrangements in place, Maharashtra is all set to bid goodbye to Bappa this year (Photo credit: Uma Kadam) PUNE: “Mi majhya...

SPPU ने कॅश फॉर डिग्री घोटाळ्यात पोलिस तक्रार दाखल केली, कर्मचाऱ्याला निलंबित केले. पुणे...

0
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने पदवी प्रमाणपत्राच्या कथित रोख रकमेप्रकरणी बुधवारी पोलिसात तक्रार दाखल केली, ज्यामध्ये विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यावर...

मी पायउतार होण्यापूर्वी सर्व मुद्दे निकाली काढले होते: माजी DLTA प्रमुख अनिल खन्ना |...

0
पुणे: ऑल इंडिया टेनिस असोसिएशन (AITA) तसेच दिल्ली लॉन टेनिस असोसिएशन (DLTA) चे माजी अध्यक्ष अनिल खन्ना यांनी बुधवारी सांगितले की, DLTA...

स्टेकहोल्डर्सची दिल्लीत बैठक झाली, पण राष्ट्रवादीचे विलीनीकरण नाही असे पवार म्हणतात. पुणे बातम्या

0
शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस (एसपी) एनडीएशी हातमिळवणी करणार असल्याच्याही अटकळ सुरू आहेत. पुणे : ज्येष्ठ राजकारणी शरद पवार यांनी मंगळवारी नवी दिल्लीत...

कायदेशीर नोटीस AITA आणि DLTA च्या निष्कासनासाठी कॉल करते. पुणे बातम्या

0
पुणे: अडचणीत सापडलेल्या ऑल इंडिया टेनिस असोसिएशन (एआयटीए) आणि दिल्ली लॉन टेनिस असोसिएशनला मंगळवारी दिल्लीच्या भूमी आणि विकास अधिकारी (एल अँड डीओ)...

error: Content is protected !!