Homeक्राईमताशीभरात ऑपरेशन क्लीन स्वीप’!अल्पवयीन मुलीचे अपहरण हाणून पाडत देवणी पोलिसांचा धडाकेबाज अॅक्शन...

ताशीभरात ऑपरेशन क्लीन स्वीप’!अल्पवयीन मुलीचे अपहरण हाणून पाडत देवणी पोलिसांचा धडाकेबाज अॅक्शन मोड; तिघे आरोपी लोखंडी कचाट्यात

वलांडी / मुकेश कांबळे

देवणी परिसरात अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेल्याची धक्कादायक घटना उघड होताच पोलिसांनी अक्षरशः वेळेशी स्पर्धा करत ‘ऑपरेशन क्लीन स्वीप’ राबवले आणि अवघ्या एका तासाच्या आत तिन्ही आरोपींना जेरबंद करत मुलीची सुरक्षित सुटका केली. २५ फेब्रुवारी २०२६ रोजी प्राप्त झालेल्या तक्रारीनुसार देवणी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ४४/२०२६ अंतर्गत कलम १३७(२), ३(५) बी.एन.एस.एस. अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. प्रकरणाचे गांभीर्य ओळखून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपास पथक तत्काळ सक्रिय करण्यात आले.

तपासादरम्यान गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या अचूक माहितीवरून आरोपी नामे १) कलीम हाकानी शेख (वय २० वर्षे), २) अशपाक करीम शेख (वय २० वर्षे) व ३) बिलाल खालेद कुरेशी (वय २५ वर्षे), सर्व रा. उदगीर, ता. उदगीर यांनी अल्पवयीन मुलीस त्यांच्या ताब्यातील स्काय ब्ल्यू रंगाच्या ईटॉस चारचाकी वाहनातून छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने नेल्याचे स्पष्ट झाले. ही माहिती मिळताच देवणी पोलिसांनी क्षणाचाही विलंब न लावता बीड, छत्रपती संभाजीनगर तसेच महामार्ग पोलीस यंत्रणेशी तातडीने संपर्क साधत साखळी समन्वय उभारला.

बीड–छत्रपती संभाजीनगर महामार्गावर पाचोड टोलनाक्याजवळ नाकाबंदी लावण्यात आली. वाहनाचा रंग, मॉडेल, आरोपींची नावे व हालचालींबाबतची माहिती संबंधित सर्व पोलीस ठाण्यांना देण्यात आली. या दरम्यान महामार्ग सुरक्षा पथकाच्या मदतीने गेवराई परिसरात संशयित वाहन अडवण्यात आले. तपासणीदरम्यान तिन्ही आरोपींसह अल्पवयीन मुलगी सुरक्षित ताब्यात घेण्यात आली. या निर्णायक कारवाईमुळे संभाव्य गंभीर अनर्थ टळला.

देवणी पोलीस ठाण्याचे तपासी अधिकारी पोउपनि व-हाडे, सफौ सय्यद व महिला पोलीस अंमलदार गोपे यांना तत्काळ गेवराई येथे पाठविण्यात आले. त्यांनी आरोपींना ताब्यात घेत वाहन जप्त केले व पीडित मुलीस आवश्यक संरक्षण देत देवणी येथे आणले. प्राथमिक चौकशीत मुलीस फूस लावून पळवून नेल्याचे निष्पन्न झाले असून गुन्ह्याच्या कटाचा पुढील तपास सुरू आहे.

ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक लातूर श्री. अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण व उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. विशाल ढुमे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. तसेच सपोनि बी. एस. गायकवाड यांच्या नेतृत्वाखालील पथकाने समन्वय, धाडस आणि अचूक नियोजन दाखवत कारवाई यशस्वी केली. तक्रार नोंदणीपासून आरोपींच्या अटकेपर्यंतचा कालावधी अत्यंत कमी असल्याने देवणी पोलिसांच्या कार्यक्षमतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.

अल्पवयीन मुलीची सुरक्षित सुटका करून गुन्हेगारांना ताशीभरात गजाआड करणारी ही कारवाई गुन्हेगारी प्रवृत्तींना थेट इशारा देणारी ठरली आहे. “कायद्याच्या हातातून सुटका नाही” हा स्पष्ट संदेश देत देवणी पोलिसांनी पुन्हा एकदा आपल्या सजगतेची आणि धडक कृतीची छाप उमटवली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

City’s biggest goodbye, cops’ longest shift: The human cost of Ganpati visarjan duty |...

0
With elaborate arrangements in place, Maharashtra is all set to bid goodbye to Bappa this year (Photo credit: Uma Kadam) PUNE: “Mi majhya...

SPPU ने कॅश फॉर डिग्री घोटाळ्यात पोलिस तक्रार दाखल केली, कर्मचाऱ्याला निलंबित केले. पुणे...

0
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने पदवी प्रमाणपत्राच्या कथित रोख रकमेप्रकरणी बुधवारी पोलिसात तक्रार दाखल केली, ज्यामध्ये विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यावर...

मी पायउतार होण्यापूर्वी सर्व मुद्दे निकाली काढले होते: माजी DLTA प्रमुख अनिल खन्ना |...

0
पुणे: ऑल इंडिया टेनिस असोसिएशन (AITA) तसेच दिल्ली लॉन टेनिस असोसिएशन (DLTA) चे माजी अध्यक्ष अनिल खन्ना यांनी बुधवारी सांगितले की, DLTA...

स्टेकहोल्डर्सची दिल्लीत बैठक झाली, पण राष्ट्रवादीचे विलीनीकरण नाही असे पवार म्हणतात. पुणे बातम्या

0
शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस (एसपी) एनडीएशी हातमिळवणी करणार असल्याच्याही अटकळ सुरू आहेत. पुणे : ज्येष्ठ राजकारणी शरद पवार यांनी मंगळवारी नवी दिल्लीत...

कायदेशीर नोटीस AITA आणि DLTA च्या निष्कासनासाठी कॉल करते. पुणे बातम्या

0
पुणे: अडचणीत सापडलेल्या ऑल इंडिया टेनिस असोसिएशन (एआयटीए) आणि दिल्ली लॉन टेनिस असोसिएशनला मंगळवारी दिल्लीच्या भूमी आणि विकास अधिकारी (एल अँड डीओ)...

error: Content is protected !!