Homeसामाजिकब्ल्यूबेल पोदार लर्न स्कूलमध्ये शिवजयंती उत्साहात साजरी

ब्ल्यूबेल पोदार लर्न स्कूलमध्ये शिवजयंती उत्साहात साजरी

प्रभातफेरी, भाषणे व सांस्कृतिक कार्यक्रमांनी परिसर शिवमय

वलांडी | प्रतिनिधी

दि. 19 फेब्रुवारी 2026 रोजी ब्ल्यूबेल पोदार लर्न स्कूल, वलांडी येथे कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली. जवळगा गावातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शिवजयंतीच्या निमित्ताने संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माधवराव हुडे हे होते. यावेळी सरपंच विजयकुमार पाटील, चेअरमन शेषेराव पाटील, प्रशांत पाटील, अनिल पाटील, किशोर बिरादार, दिलीप कवठाळे तसेच शाळेचे प्राचार्य विनोज पी. बी. व उपप्राचार्या प्रगती संगोलगे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. अध्यक्ष माधवराव हुडे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

शाळेतील विद्यार्थ्यांनी राजमाता जिजाऊ व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वेशभूषेत प्रभातफेरी काढून गावात शिवमय वातावरण निर्माण केले. या प्रभातफेरीने ग्रामस्थांचे लक्ष वेधून घेतले. विद्यार्थ्यांनी महाराजांच्या जीवनकार्यावर भाषणे सादर करून त्यांचा पराक्रम आणि आदर्श विचार उपस्थितांसमोर मांडला.

यावेळी विद्यार्थ्यांनी शिवरायांच्या विविध गीतांवर नृत्य सादर करून कार्यक्रमात रंगत आणली. उपस्थित पालक व गावातील लहानथोरांनी विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाला भरभरून दाद दिली. विद्यार्थ्यांच्या शिवगर्जना व घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.

हा कार्यक्रम संस्थाअध्यक्ष अमित पोस्ते तसेच सदस्य शंकर पोस्ते, लक्ष्मीकांत पोस्ते, अरुण पोस्ते, माधव हुडे, मल्लिकार्जुन हुडे, अमोल आंबेगावे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि शाळेचे प्राचार्य, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या परिश्रमाने यशस्वीरीत्या पार पडला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

City’s biggest goodbye, cops’ longest shift: The human cost of Ganpati visarjan duty |...

0
With elaborate arrangements in place, Maharashtra is all set to bid goodbye to Bappa this year (Photo credit: Uma Kadam) PUNE: “Mi majhya...

SPPU ने कॅश फॉर डिग्री घोटाळ्यात पोलिस तक्रार दाखल केली, कर्मचाऱ्याला निलंबित केले. पुणे...

0
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने पदवी प्रमाणपत्राच्या कथित रोख रकमेप्रकरणी बुधवारी पोलिसात तक्रार दाखल केली, ज्यामध्ये विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यावर...

मी पायउतार होण्यापूर्वी सर्व मुद्दे निकाली काढले होते: माजी DLTA प्रमुख अनिल खन्ना |...

0
पुणे: ऑल इंडिया टेनिस असोसिएशन (AITA) तसेच दिल्ली लॉन टेनिस असोसिएशन (DLTA) चे माजी अध्यक्ष अनिल खन्ना यांनी बुधवारी सांगितले की, DLTA...

स्टेकहोल्डर्सची दिल्लीत बैठक झाली, पण राष्ट्रवादीचे विलीनीकरण नाही असे पवार म्हणतात. पुणे बातम्या

0
शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस (एसपी) एनडीएशी हातमिळवणी करणार असल्याच्याही अटकळ सुरू आहेत. पुणे : ज्येष्ठ राजकारणी शरद पवार यांनी मंगळवारी नवी दिल्लीत...

कायदेशीर नोटीस AITA आणि DLTA च्या निष्कासनासाठी कॉल करते. पुणे बातम्या

0
पुणे: अडचणीत सापडलेल्या ऑल इंडिया टेनिस असोसिएशन (एआयटीए) आणि दिल्ली लॉन टेनिस असोसिएशनला मंगळवारी दिल्लीच्या भूमी आणि विकास अधिकारी (एल अँड डीओ)...

error: Content is protected !!