Homeताज्या बातम्यालातुर जिल्हा परिषदेच्या वलांडी,जवळगा व बोरोळ जिल्हा परिषद गट व गनासह तळेगाव...

लातुर जिल्हा परिषदेच्या वलांडी,जवळगा व बोरोळ जिल्हा परिषद गट व गनासह तळेगाव विळेगाव,दवन हिप्परगा गणातील काँग्रेस आघाडी उमेदवार प्राचारार्थ जाहीर सभा संपन्न

 

काँग्रेस आघाडी उमेदवाराना विजयी करण्याचा मतदारांचा निर्धार

 

*फसव्या फेकाफेकी घोषणा पासून मतदारांनी सावध रहावे*

 

*माजी मंत्री आमदार अमित विलासरावजी देशमुख यांचे मतदारांना आवाहन*

 

वलांडी प्रतिनिधी

 

 

राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातुर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत लातुर जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ अनुषंगाने मंगळवार दि.०३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी देवणी तालुक्यातील वलांडी या ठिकाणी काँग्रेस आघाडी उमेदवारांच्या प्रचारार्थ जाहीर प्रचार सभा पार पडली.

 

लातुर जिल्ह्यातील देवणी तालुक्यातल्या वलांडी जिल्हा परिषद गटातील सौ.अंजली अजित बेळकोने,व पंचायत समिती गणातील श्री.उमेश अमृतराव बिरादार आणि विळेगाव पंचायत समिती गणातील श्री.नागनाथ दत्तात्रय सगर,जवळगा गटाचे विकास डगवाले,पंचायत समिती गणाचे सौ.सुरेखा सोनकांबळे, दवन हिप्परगा गणाचे सौ.प्रभावती ज्ञानोबा पाटील,बोरोळ गटाचे औदुंबर पांचाळ,पंचायत समिती गणाचे श्री.राहुल केशव बालुरे तर तळेगाव गणाच्या सौ. प्रणिता रोहित चामले या काँग्रेस आघाडी उमेदवारांच्या प्रचारार्थ सभेचे आयोजन करण्यात आले होते.

 

लातुर जिल्हा परिषद व पंचायत समिती स्थानिक स्वराज्य संस्था सार्वत्रिक निवडणूक २०२६ निमित्ताने जिल्ह्यात आपल्या उमेदवारांच्या प्राचारार्थ काँग्रेस आघाडीकडून कॉर्नर बैठक,जाहीर प्रचार सभा तसेच मतदारांच्या भेटी घेत संवाद साधला जात असून

लातुर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकि करिता देवणी तालुक्यातील वलांडी परिषद गट व गण तसेच विळेगाव पंचायत समिती गणातील काँगेस आघाडी उमेदवाराना मतदार संघात मतदाराचा चांगला प्रतिसाद मिळत असून यामुळे सर्व उमेदवारांचा आत्मविश्वास वाढत आहे.

 

*वलांडीची सभा लक्षवेधी*

 

यावेळी बोलताना माजी मंत्री आमदार अमित देशमुख म्हणाले,लातुर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक निमित्ताने आज आपण वलांडी या ठिकाणी आयोजित या विराट सभेसाठी आपण एकत्र आलेले आहोत याचा मनस्वी आनंद होत ही लक्षवेधी प्रचाराची सभा आहे असेच म्हणावे लागेल.

 

*भाजप लोकप्रतिनिधींनी काय केले ते अगोदर सांगा मगच मत मागा*

 

निलंग्याच्या लोक प्रतिनिधीना मागील काही दिवसांपासून सकाळ,दुपार संध्याकाळ माझीच आठवण होते हे दिसते.पण या सत्ताधार्यांनी टीका टिप्पणीवर भाषण न करता आपण मागील ९ वर्षात काय केले ते सांगावे पण याना सांगायला काही नसल्याने केवळ टीका करण्याच्या पलीकडे यांच्याकडे काहीच नाही.सामान्य माणसाच्या करिता तुम्ही काय केले ते आधी सांगा.निलंगा शहराचा तालुक्याचा कायापालट आदरणीय शिवाजीराव पाटील साहेबानी,आदरणीय शिवराज पाटील साहेबानी आदरणीय विलासराव देशमुख साहेबानी काँगेस पक्षाने केला आणि हे म्हणतात सारे आम्ही केले.

 

*कर्जमाफी घोषणा हवेतच*?

 

शेतकऱ्यांना काँगेस सरकारने २००९ मध्ये व २०१९ मध्ये अशी दोन वेळा कर्जमाफी दिली तुम्ही केवळ लोकसभा व विधानसभा निवडणुकीत कर्जमाफी चे आश्वासन दिले.शेतकऱ्यांच्या सोयाबीनला हे भाव देऊ शकत नाहीत, कापसाला भाव देऊ शकत नाहीत आणि आपल्या समोर येऊन मत मागतात याना तसा नैतिक अधिकार तरी आहे काय याचा विचार भाजपने करावा असे ते म्हणाले.

 

पुढे बोलताना आमदार अमित देशमुख म्हणाले, सण १९८६ पासून २०२६ या काळात लातुर जिल्ह्यातील जनतेची सेवा अगदी प्रामाणिकपणे काँगेस पक्षाने आणि आमच्या आदरणीय नेत्यांनी केली आहे हे विसरून चालणार नाही. आजही देशातील कोणत्याही भागात आपण गेलात तर लातुरची एक वेगळी प्रतिमा तेथील लोकांच्या मनात असल्याचा अनुभव आपल्याला नेहमी येतो.

 

लातुर महानगरपालिकेवर काँग्रेस पक्षाचा झेंडा नुकत्याच झालेल्या निवडणुकीत मतदारांनी फडकवला. या ठिकाणी आलेल्या भाजप मंत्र्यांनी भाषणात सांगितले की भाजपचे सरकार चार चाकी आहे त्यातील एक चाक नरेंद्र मोदी,दुसरा चाक देवेंद्र फडणवीस तिसरा चाक पालकमंत्री आणि चौथा चाक निलंग्याचा पण त्यांना एवढे माहिती नाही लातूरच्या नागरिकांनी त्यांचा चौथा निलंग्याच्या चाक महानगरपालिका निवडणुकीत काढून फेकून दिलेला आहे याचा विचार त्यांनी करावा असे आमदार अमित देशमुख यावेळी म्हणाले.

 

महाविकास आघाडी सरकारच्या अडीच वर्षाच्या काळात आम्ही कोविड माहामारी पासून आपला बचाव कसा करायचा याचा पुरेपूर प्रयत्न केला.आम्ही आमची जबाबदारी आमची बांधिलकी जपली यापुढेही जपत राहू आमच्या जबाबदारीतुन एक इंच देखील मागे हटणार नाही असेही त्यांनी सांगितले.

 

सरकारची लाडकी बहीण योजना असेल किंवा अन्य कोणत्याही योजना असतील या योजना एकदा सुरू केल्यानंतर कधीही बंद होत नाहीत कारण या योजनेवर खर्च होणारा पैसा हा कुण्या एका पक्षाचा नसतो तर तो शासनाचा असतो,सरकारला मिळालेल्या टॅक्स मधून जमा झालेला पैसा असतो तेव्हा लाडक्या बहिणींना हे लोक धमकवतील की, आमची सत्ता नाही आल्यास आपली योजना बंद होईल पण असे अजिबात होणार नाही आपण अजिबात काळजी करू नये आशा शब्दात आमदार अमित देशमुख यांनी उपस्थित लाडक्या बहिणींना अश्वस्त केले.

 

मराठवाडा रेल्वे कोच फॅक्टरी मध्ये ५० हजार नौकऱ्या देणार म्हणाले नमो रोजगार मेळावा घेतला पण स्थानिकच्या एकालाही नौकरी दिली नाही,व्यापार उद्योग वाढवले नाही,उजनीच्या पाण्यावर आमच्यावर आरोप केला जातो यासाठी निलंग्याच्या आमदारांनी उजणीची पाणी लातूरला नाही आले तर राजीनामा देणार म्हणाले अजून पाणी नाही व राजीनामा नाही,सण २०१९ मध्ये महाविकास आघाडी सरकारच्या काळत पालकमंत्री असताना आम्ही पूर्ण केलेली कामे सुद्धा यांनीच केली असे ते सांगतात,लातुरच्या जिल्हा परिषदेच्या शाळेत पट संख्या वाढली म्हणतात ती वाढणारच यात कारण लातूरचा शैक्षणिक पॅटर्न सर्वत्र परिचित आहे यात तुमचे काय श्रेय आहे असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.

 

सद्या सर्व सामन्य जनता भाजपच्या गलथान व भ्रष्ट कारभाराला कंटाळलेली असून मतदारांनी नुकत्याच झालेल्या लातुर महानगर पालिका निवडणुकीत आपला रोष मताच्या रुपात व्यक्त करून लातूर मनपावर काँगेस पक्षाचा तिरंगा फडकवला.अगदी तशाच प्रकारे या लातुर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत देखील मतदार काँग्रेसला काही देतील असा विश्वास असून काँग्रेस आघाडीच्या उमेदवाराना भरभरून मतरुपी आशीर्वाद देऊन स्वच्छ,पारदर्शक व भ्रष्टाचार मुक्त कारभारासाठी लातुर जिल्हा परिषद व पंचायत समितीत विजयी करून पाठवावे.जेणेकरुन आपणास लोकाभिमुख प्रशासन आणि भ्रष्टाचार मुक्त पारदर्शक कारभार करून लातुर जिल्हा परिषदेला गतवैभव प्राप्त करून देता येईल असे आमदार अमित देशमुख यावेळी म्हणाले.

 

यावेळी बोलताना अशोकराव पाटील निलंगेकर म्हणाले, सण २००९ मध्ये देवणी व शिरूर अनंतपाळ तालुका निलंगा विधानसभेला जोडला गेला.त्यानंतर आदरणीय दिलीपराव देशमुख साहेबांमुळे मला जिल्हा परिषदेत कामाची संधी मिळाली पण त्या वेळची परिस्थिती वेगळी होती आजची परिस्थिती वेगळी आहे याचा विचार आपण करावा त्यावेळी मिळणारा आणि आज मिळणारा निधी यात मोठा फरक आहे.शासनाच्या अनेक योजना त्या काळात या ठिकाणी आणता आल्या पण मागील काही वर्षांत

सरकारच्या प्रशासक राज काळात या भागाच्या विकासासाठी म्हणावा तसा निधी मिळाला नाही बरीच कामे रेंगाळली. विरोधकांनी या मागील काळात बराच निधी उपलब्ध करून घेतला पण विकास कामे केली नाहीत उलट लोकांना भूल थापाना देऊन फसविण्याचे केले असे म्हणत विरोधकांनी मागील काळात जिल्हा परिषदेत काय कामे केली व किती निधी खर्च केला याची श्वेत पत्रिका काढावं आम्ही देखील आमच्या काळातील विकास कामे व त्यावरील खर्च निधी किती झाला हे सांगतो असे जाहिर आव्हान त्यांनी भाजपला या सभेत देत सर्वसामान्य माणसावर अन्याय करणाऱ्या शेतकऱ्यांकडे काणाडोळा करून उद्योजकांकडे लक्ष केंद्रित करणार्यांना या निवडणुकीत धडा व काँग्रेस आघाडी उमेदवाराना साधी द्यावी अशी विनंती त्यांनी केली.

 

दरम्यान या जाहीर प्रचार सभेप्रसंगी काँग्रेस पक्षाचे लातुर जिल्हाध्यक्ष अभय साळुंके,औदुंबर पांचाळ,

दिलीप पाटील नागराळकर या मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करीत काँग्रेस आघाडीच्या सर्व उमेदवाराना बहुमताने विजयी करून लातुर जिल्हा परिषद व पंचायत समिती मध्ये पाठवावे आणि आपल्या सेवेची संधी उपलब्ध करून द्यावी अशी विनंती केली.

 

यावेळी डॉ. अरविंद भाताम्बरे,हमीद भाई शेख, विजयकुमार पाटील,चक्रधर शेळके,रामभाऊ भंडारे,राविकिशन कारखाने,भागवानराव पाटील, अंबादास दानवे,हकीम भाई बौडीवाले,मुश्ताक कादरी,सचिन बेंजर्गे,इसरार सगरे,नागनाथ सगर

यांच्यासह उजनी जिल्हा परिषद गट व गण यासह शिवली पंचायत समिती गणातील मतदार बंधू भगिनी, काँग्रेस आघाडिचे पदाधिकारी,सदस्य, कार्यकर्ते, महिला भगिनी व परीसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

City’s biggest goodbye, cops’ longest shift: The human cost of Ganpati visarjan duty |...

0
With elaborate arrangements in place, Maharashtra is all set to bid goodbye to Bappa this year (Photo credit: Uma Kadam) PUNE: “Mi majhya...

SPPU ने कॅश फॉर डिग्री घोटाळ्यात पोलिस तक्रार दाखल केली, कर्मचाऱ्याला निलंबित केले. पुणे...

0
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने पदवी प्रमाणपत्राच्या कथित रोख रकमेप्रकरणी बुधवारी पोलिसात तक्रार दाखल केली, ज्यामध्ये विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यावर...

मी पायउतार होण्यापूर्वी सर्व मुद्दे निकाली काढले होते: माजी DLTA प्रमुख अनिल खन्ना |...

0
पुणे: ऑल इंडिया टेनिस असोसिएशन (AITA) तसेच दिल्ली लॉन टेनिस असोसिएशन (DLTA) चे माजी अध्यक्ष अनिल खन्ना यांनी बुधवारी सांगितले की, DLTA...

स्टेकहोल्डर्सची दिल्लीत बैठक झाली, पण राष्ट्रवादीचे विलीनीकरण नाही असे पवार म्हणतात. पुणे बातम्या

0
शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस (एसपी) एनडीएशी हातमिळवणी करणार असल्याच्याही अटकळ सुरू आहेत. पुणे : ज्येष्ठ राजकारणी शरद पवार यांनी मंगळवारी नवी दिल्लीत...

कायदेशीर नोटीस AITA आणि DLTA च्या निष्कासनासाठी कॉल करते. पुणे बातम्या

0
पुणे: अडचणीत सापडलेल्या ऑल इंडिया टेनिस असोसिएशन (एआयटीए) आणि दिल्ली लॉन टेनिस असोसिएशनला मंगळवारी दिल्लीच्या भूमी आणि विकास अधिकारी (एल अँड डीओ)...

City’s biggest goodbye, cops’ longest shift: The human cost of Ganpati visarjan duty |...

0
With elaborate arrangements in place, Maharashtra is all set to bid goodbye to Bappa this year (Photo credit: Uma Kadam) PUNE: “Mi majhya...

SPPU ने कॅश फॉर डिग्री घोटाळ्यात पोलिस तक्रार दाखल केली, कर्मचाऱ्याला निलंबित केले. पुणे...

0
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने पदवी प्रमाणपत्राच्या कथित रोख रकमेप्रकरणी बुधवारी पोलिसात तक्रार दाखल केली, ज्यामध्ये विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यावर...

मी पायउतार होण्यापूर्वी सर्व मुद्दे निकाली काढले होते: माजी DLTA प्रमुख अनिल खन्ना |...

0
पुणे: ऑल इंडिया टेनिस असोसिएशन (AITA) तसेच दिल्ली लॉन टेनिस असोसिएशन (DLTA) चे माजी अध्यक्ष अनिल खन्ना यांनी बुधवारी सांगितले की, DLTA...

स्टेकहोल्डर्सची दिल्लीत बैठक झाली, पण राष्ट्रवादीचे विलीनीकरण नाही असे पवार म्हणतात. पुणे बातम्या

0
शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस (एसपी) एनडीएशी हातमिळवणी करणार असल्याच्याही अटकळ सुरू आहेत. पुणे : ज्येष्ठ राजकारणी शरद पवार यांनी मंगळवारी नवी दिल्लीत...

कायदेशीर नोटीस AITA आणि DLTA च्या निष्कासनासाठी कॉल करते. पुणे बातम्या

0
पुणे: अडचणीत सापडलेल्या ऑल इंडिया टेनिस असोसिएशन (एआयटीए) आणि दिल्ली लॉन टेनिस असोसिएशनला मंगळवारी दिल्लीच्या भूमी आणि विकास अधिकारी (एल अँड डीओ)...
error: Content is protected !!