Homeक्राईमलातूरच्या रस्त्यावर रक्ताचा सडा… ‘विद्यानगरी’ की गुंडांची पंढरी?

लातूरच्या रस्त्यावर रक्ताचा सडा… ‘विद्यानगरी’ की गुंडांची पंढरी?

भररस्त्यात तरुणाची निर्घृण हत्या; कोयता गँगच्या दहशतीने शहर हादरले

लातूर… शिक्षणाचे माहेरघर म्हणून देशभरात ओळखले जाणारे शहर. ‘लातूर पॅटर्न’ने देशाला आयएएस, आयपीएस अधिकारी, डॉक्टर आणि अभियंते घडवले. मात्र आज याच लातूरची ओळख बदलण्याच्या मार्गावर असून, शहरात वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिकांमध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे. काल सायंकाळी पुरणमल लाहोटी तंत्रनिकेतनसमोर विक्रम नारायण पांचाळ या निष्पाप तरुणाची भररस्त्यात निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेत त्याच्या तीन मित्रांवरही प्राणघातक हल्ला करून त्यांना गंभीर अवस्थेत सोडून देण्यात आले. या घटनेमुळे लातूरच्या कायदा-सुव्यवस्थेचे भयावह वास्तव समोर आले असून, गुन्हेगारांना पोलिसांचा धाक उरलेला नाही का? असा प्रश्न आता सर्वसामान्य नागरिक विचारत आहेत.

गुन्हेगारांचे वाढते धाडस… पोलिसांचा वचक संपलाच!

शहरात कोयते नाचवणाऱ्या टोळ्या, हत्या आणि दहशतीचा उन्माद

गेल्या काही दिवसांतील घटनाक्रम पाहता लातूरमध्ये गुन्हेगारीने डोके वर काढले आहे. शिवाजी नगर हद्दीतील वैभव नगर परिसरात कोयते नाचवत दहशत माजवणाऱ्या टोळ्या असोत, की डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील हत्या… सर्व घटनांमागे गुन्हेगारांचे वाढलेले धाडस स्पष्टपणे दिसून येते. शहरातील गजबजलेल्या ‘गोलाई’ परिसरातही भाईगिरी खुलेआम चालत असल्याचे चित्र आहे. रात्रीच्या वेळी सामान्य माणूस घराबाहेर पडण्यास घाबरत आहे. लातूरसारख्या शहरात जर नागरिकांना सुरक्षित वाटत नसेल, तर प्रशासनाचे अस्तित्व नेमके कुठे आहे? असा सवाल उपस्थित होत आहे.

ट्युशन हब की गुन्हेगारीचा अड्डा?

विद्यार्थ्यांच्या गर्दीचा गैरफायदा; छेडछाड, भाईगिरी आणि ड्रग्जचा विळखा

लातूरमध्ये परजिल्ह्यातून हजारो विद्यार्थी करिअर घडवण्यासाठी येतात. शहरातील ट्युशन संस्कृती देशभर प्रसिद्ध आहे. मात्र, याच गर्दीचा गैरफायदा घेत काही प्रवृत्ती शिक्षणाच्या नावाखाली गुन्हेगारी वाढवत आहेत. ट्युशन परिसरात दुचाकीवर तीन-चार जण बसून फिरणे, मुलींची छेड काढणे, दहशत निर्माण करणे आणि विरोध केला तर थेट कोयता उपसणे, हे प्रकार आता नित्याचे झाले आहेत. काही तरुण स्थानिक टोळ्यांशी हातमिळवणी करून अमली पदार्थ, ड्रग्ज आणि गोळ्यांच्या व्यापारात अडकत आहेत. वेळेत कठोर कारवाई झाली नाही, तर लातूरचा ‘पॅटर्न’ शिक्षणासाठी नव्हे तर विनाशासाठी ओळखला जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

प्रशासनाचे अपयश… केवळ बैठका पुरेशा नाहीत!

गस्त नावालाच; गुप्तचर विभाग नेमका काय करतोय?

जिल्ह्याचे पोलीस प्रमुख अमोल तांबे यांनी हे लक्षात घेतले पाहिजे की, केवळ मॅरेथॉन बैठका घेऊन किंवा सायबर क्राईमच्या गप्पा मारून रस्त्यावरची गुंडगिरी संपणार नाही. जर वसतिगृहाच्या समोर भरदिवसा तरुणांवर प्राणघातक हल्ले होत असतील, तर पोलिसांची गस्त आणि गुप्तचर यंत्रणा नेमकी काय करत आहे? असा गंभीर प्रश्न उपस्थित होतो. जिल्ह्याचे पालकमंत्री ‘राजे’ असतानाही जनता जर दहशतीत वावरत असेल, तर त्या सत्तेचा उपयोग काय? राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लातूरच्या ढासळत्या कायदा-सुव्यवस्थेकडे गांभीर्याने पाहण्याची वेळ आली आहे.

आता कठोर कारवाईची गरज… नाहीतर जनतेचा उद्रेक अटळ!

कोयता गँगवर तात्काळ कारवाई करा; ड्रग्ज रॅकेटचे मूळ उखडा

शांतता समित्यांच्या बैठका आणि आश्वासनांनी प्रश्न सुटणार नाही. शहरात दहशत पसरवणाऱ्या टोळ्यांचे कंबरडे मोडणे गरजेचे आहे. कोयता गँगची भररस्त्यात धिंड काढून कायद्याचा जरब निर्माण करावा लागेल. ड्रग्ज पेडलर्सच्या मुसक्या आवळून या रॅकेटचे मूळ शोधून काढणे आवश्यक आहे. लातूरची ओळख ही ज्ञानाची आणि संस्कारांची आहे, ती रक्ताच्या थारोळ्यात माखू देऊ नका.

विक्रम पांचाळचा बळी हा शेवटचा असावा… अन्यथा लातूरकरांचा संयम सुटायला वेळ लागणार नाही!

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

कॉसमॉस बँकेच्या माजी अध्यक्षांचे निधन | पुणे बातम्या

0
पुणे : कॉसमॉस कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेडचे ​​माजी अध्यक्ष मुकुंद अभ्यंकर यांचे गुरुवारी निधन झाले. ते 89 वर्षांचे होते. त्यांना 1978 मध्ये बँकेच्या...

भोरमध्ये अन्न प्रक्रिया केंद्र, व्यवहार्यता तपासण्यासाठी सरकारची मुख्यमंत्र्यांची नजर. पुणे बातम्या

0
पुणे : भोर तालुक्याला अन्न प्रक्रिया विशेष आर्थिक क्षेत्र (एसईझेड) किंवा निर्यात केंद्र म्हणून विकसित करण्याच्या व्यवहार्यतेची सरकार तपासणी करेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...

पहिली CBSE इयत्ता पुण्यातील विद्यार्थ्यांनी चांगला निकाल लावला | पुणे बातम्या

0
पुणे/मुंबई: सीबीएसई इयत्तामुलींनी पुन्हा एकदा मुलांपेक्षा 95% उत्तीर्ण होण्याचे प्रमाण 92.7% विरुद्ध नोंदवले. ट्रान्सजेंडर विद्यार्थ्यांचा उत्तीर्ण होण्याचा दर 87.5% आहे.पुण्यातील शाळांनी उच्च...

नाशिक टीसीएस प्रकरण: इन्फोसिसने पुणे छेडछाडीच्या आरोपांवर निवेदन जारी केले; नाशिक टीसीएस प्रकरणानंतर छाननीत...

0
पुणे: आयटी क्षेत्रातील प्रमुख इन्फोसिसने बुधवारी त्यांच्या पुण्यातील बिझनेस प्रोसेस मॅनेजमेंट (बीपीएम) सुविधेवर कामाच्या ठिकाणी छळवणूक केल्याच्या सोशल मीडियाच्या आरोपांना औपचारिक प्रतिसाद...

रहिवाशांच्या तक्रारींनंतर पीएमसीने तीन महिन्यांत पुण्यातील 30 आरएमसी प्लांटवर कारवाई केली. पुणे बातम्या

0
पुणे: नागरिकांच्या अनेक तक्रारींनंतर नागरी संस्थेने शहरातील रेडी मिक्स काँक्रीट प्लांट्स विरोधात मोहीम तीव्र केली आहे. गेल्या तीन महिन्यांत, पुणे महानगरपालिकेने (पीएमसी)...

error: Content is protected !!