Homeक्राईमदेवणी तहसील कार्यालयासमोर कुटुंब व जनावरांसह आमरण उपोषण

देवणी तहसील कार्यालयासमोर कुटुंब व जनावरांसह आमरण उपोषण

 प्रतिनिधी: वलांडी

देवणी तालुक्यातील आंबेगाव येथील एका हताश शेतकऱ्याने प्रशासनाकडे वारंवार दाद मागूनही न्याय न मिळाल्याने अखेर आपल्या संपूर्ण कुटुंबासह आणि जनावरांसह देवणी तहसील कार्यालयासमोर दि. ११ फेब्रुवारी २०२६ पासून आमरण उपोषण सुरू केले आहे. शेतजमीन बळकावण्याचा कट रचण्यात आला असून कुटुंबाच्या जीवितास धोका असल्याचा गंभीर आरोप तक्रारीतून समोर आला आहे.

आंबेगाव येथील रहिवासी मधुकर एकनाथ काटमपल्ले यांची मौजे आंबेगाव येथे गट नं. २०/ब/२ मध्ये सामायिक मालकीची शेतजमीन आहे. या जमिनीत त्यांनी उसाची लागवड केली होती. मात्र, दि. २१ डिसेंबर २०२५ रोजी शेजारील काही व्यक्ती व एका साखर कारखान्याच्या कर्मचाऱ्यांनी संगनमताने त्यांच्या शेतात बेकायदेशीर प्रवेश केला. काटमपल्ले यांनी कष्टाने पिकवलेला ऊस स्वतःचा असल्याचे भासवून तो थेट साखर कारखान्याला देण्यात आल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.

प्रशासनाचे आदेश धाब्यावर?

या प्रकरणी मधुकर काटमपल्ले व त्यांचा मूलगा नरसिंग काटमपल्ले यांनी पोलीस ठाणे, उपविभागीय पोलीस अधिकारी तसेच जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत तक्रारी केल्या. मात्र, कागदोपत्री आदेश निघूनही प्रत्यक्षात कोणतीही ठोस कारवाई झाल्याचे दिसून येत नाही.

पोलीस निरीक्षकांनी कारवाईचे पत्र दिले, मात्र प्रत्यक्ष पंचनामा करण्यात आला नाही.

उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी महसूल व भूमी अभिलेख विभागासह संयुक्त कारवाईचे आदेश दिले, पण त्याची अंमलबजावणी झाली नाही.

पोलीस अधीक्षकांनी घटनास्थळाचे फोटो पाठवण्याच्या सूचना दिल्या, तरी स्थानिक पातळीवर कोणतीही हालचाल झाली नाही.

जीवितास धोका, शेवटचा पर्याय म्हणून उपोषण

तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, विरोधी गट त्यांच्या शेतात पार्ट्या करून जबरदस्तीने ताबा घेण्याचा तसेच कुटुंबाला इजा पोहोचवण्याचा कट रचत आहे. दिवाणी व फौजदारी दावे दाखल करूनही परिस्थितीत बदल न झाल्याने अखेर आमरण उपोषणाचा टोकाचा निर्णय घ्यावा लागल्याचे काटमपल्ले यांनी सांगितले.
मला किंवा माझ्या कुटुंबाला काही अनुचित घडल्यास त्यास संपूर्णपणे महसूल व पोलीस प्रशासन जबाबदार राहील,” असा गंभीर इशाराही मधुकर काटमपल्ले यांनी दिला आहे.

या गंभीर घटनेनंतर तरी जिल्हा प्रशासन व पोलीस विभाग हालचाल करून या शेतकरी कुटुंबाला न्याय देणार की केवळ कागदी घोडे नाचवणार, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

City’s biggest goodbye, cops’ longest shift: The human cost of Ganpati visarjan duty |...

0
With elaborate arrangements in place, Maharashtra is all set to bid goodbye to Bappa this year (Photo credit: Uma Kadam) PUNE: “Mi majhya...

SPPU ने कॅश फॉर डिग्री घोटाळ्यात पोलिस तक्रार दाखल केली, कर्मचाऱ्याला निलंबित केले. पुणे...

0
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने पदवी प्रमाणपत्राच्या कथित रोख रकमेप्रकरणी बुधवारी पोलिसात तक्रार दाखल केली, ज्यामध्ये विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यावर...

मी पायउतार होण्यापूर्वी सर्व मुद्दे निकाली काढले होते: माजी DLTA प्रमुख अनिल खन्ना |...

0
पुणे: ऑल इंडिया टेनिस असोसिएशन (AITA) तसेच दिल्ली लॉन टेनिस असोसिएशन (DLTA) चे माजी अध्यक्ष अनिल खन्ना यांनी बुधवारी सांगितले की, DLTA...

स्टेकहोल्डर्सची दिल्लीत बैठक झाली, पण राष्ट्रवादीचे विलीनीकरण नाही असे पवार म्हणतात. पुणे बातम्या

0
शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस (एसपी) एनडीएशी हातमिळवणी करणार असल्याच्याही अटकळ सुरू आहेत. पुणे : ज्येष्ठ राजकारणी शरद पवार यांनी मंगळवारी नवी दिल्लीत...

कायदेशीर नोटीस AITA आणि DLTA च्या निष्कासनासाठी कॉल करते. पुणे बातम्या

0
पुणे: अडचणीत सापडलेल्या ऑल इंडिया टेनिस असोसिएशन (एआयटीए) आणि दिल्ली लॉन टेनिस असोसिएशनला मंगळवारी दिल्लीच्या भूमी आणि विकास अधिकारी (एल अँड डीओ)...

error: Content is protected !!